________________
प्रकरण १९ : समासविचार
३०३
विग्रहात (अनुस्वारापुढे) 'च' अथवा (स्वरापुढे) 'य' यांचा उपयोग करावा लागतो व पदांची प्रथमा विभक्ति वापरली जाते.
अ) इतरेतर द्वंद्व
इतरेतर द्वंद्व समासात वस्तु एकेकट्या गणल्या जातात. म्हणजेच त्या स्वतंत्रपणे विचारात घेतल्या जातात. साहजिकच हा समास नेहमी अनेक वचनी असतो. आणि अन्त्य पदाच्या लिंगावरून संपूर्ण समासाचे लिंग ठरते.
उदाहरणे : १) बीयहरियाई - बीयाणि य हरियाई च । २) गामनयरेसुगामा य नयरा य तेसु। ३) हिरीसिरिधिइकित्तिबुध्दिलच्छीओ- हिरी य सिरीय धिई य कित्ती य बुध्दी य लच्छी य ।
आ) समाहार द्वंद्व
समाहार द्वंद्वात' वस्तु समूहदृष्टीने विचारात घेतल्या असल्याने हा समास समुदायवाचक वा एकदी संयुक्त कल्पना दाखविणारा असतो. हा समास प्रायः नपुं. ए. व. त असतो.
उदाहरणे : १) मंससोणिय-मसं य सोणियं च । २) कुथुपिवीलियं - कुंथू य पिवीलिया य तेसिं समाहारो। ३) अन्नपाणं-अन्नं च पाणं च । ४) वहुवरं - वहू य वरो य।
टीप : समास इतरेतर' करावा की ‘समाहार' करावा हे वक्त्याच्या इच्छेवर रहात असल्याने कधी कधी त्याच पदांचा समास इतरेतर तसाच ‘समाहार'
१ कधी 'वा' या विकल्पवाचकाचा विग्रहात उपयोग केला जातो. २ प्रायः शरीर अवयव वाचक शब्द , कीटक वाचक शब्द, स्वाभाविक वैर
असणारे प्राणी दाखविणारे शब्द स्वाभाविक विरोध दर्शक शब्द
इत्यादींचा समाहार द्वंद्व केलेला आढळतो. ३ प्रायः म्हणण्याचे कारण असे की अर्धमागधीत कधी अन्त्यपदाचे जे लिंग
तेच समाहार द्वंद्वाचेही लिंग आढळते. उदा. छुहातण्हाए। ४ विग्रहात 'च' वा 'य' शिवाय तेसिं समाहारो असे शब्दही वापरले जातात.