________________
प्रकरण १९ : समासविचार
३०१
हा संबंध व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्या संपूर्ण समासात असते.
२) असा संबंध असण्यास किमान दोन शब्दांची आवश्यकता असल्याने समासात किमान दोन पदे पाहिजेतच.
३) संबंध समासाचा अर्थ हा त्यातील पदांच्या व्यक्तिगत स्वतंत्र अर्थाहून भिन्न असला तरी त्या अर्थाच्या संबंधातूनच निर्माण होणारा जो अर्थ तो त्या संपूर्ण सामासाचा अर्थ होय. उदा. 'भवभय' मध्ये ‘भवापासून भय' हा अर्थ जरी भव आणि भय यांच्या व्यक्तिगत अर्थाहून भिन्न आहे. तरी तो त्यांच्या अर्थाच्या संबंधातूनच सिध्द झालेला आहे.
४) अनेक शब्दांचे अर्थदृष्ट्या एकीकरण होऊन समास बनत असल्याने
५) समासात जे अनेक शब्द येतात. त्यांतील शेवटच्या शब्दाखेरीज इतर सर्वांच्या१ विभक्ती नाहीशा होतात. साहजिकच शेवटच्या खेरीज इतर शब्द आपापल्या मूळ स्वरूपात ठेवले जातात.
६) व्याकरणदृष्ट्या वाक्यात समासाचे जे लिंग, वचन, विभक्ति' असेल ती सर्व त्या समासातील फक्त अन्त्यपदाला लागू पडतात. उदा. सुहणिसण्णे, जाणगिहेसु, उच्चनीयमज्झिमकुलाइं इत्यादी २९१ समासाची पदे
जे शब्द एकत्र येऊन समास बनतो त्यांना समासाची पदे म्हणतात. पदांच्या समासातील स्थानक्रमावरून त्यांना पूर्वपद, उत्तरपद अशा संज्ञा दिल्या जातात. उदा. 'नीलुप्पल' मध्ये 'नील' हे पूर्वपद व उप्पल हे उत्तरपद होय.
नामे, विशेषणे, धातुसाधिते व अव्यये ही समासात पद म्हणून येऊ शकतात. २९२ समासाचा विग्नह
समासातील पदांचा परस्पर संबंध किंवा त्या पदांचा इतर वस्तूशी असणारा संबंध -जो समासात प्रत्यक्षपणे व्यक्त असत नाही.
१ कधी समासातील पूर्वपदाची विभक्ती तशीच राहते. अशा समासांना ‘अलुक समास'
म्हणतात. उदा. अंतेवासि, खेयर, जुहिट्ठिल इत्यादी
अव्ययीभाव समास हा जरी नपु. द्वि. ए. व त असतो. तरी अर्धमागधीत कधी त्याची ___ इतर विभक्ती आढळते. उदा. जावज्जीवाए, पडिरूवेण इत्यादी