________________
प्रकरण १९
समासविचार SALABRASB2BRUAR 2828288*AX88282828282828282828282
२८८ अर्धमागधीतील समासविचार
प्राकृत वैयाकरणांनी प्राकृतमधील समासांचा विचार स्वतंत्रपणे केलेला नाही. कारण प्राकृतमधील' समासविचार हा संस्कृतमधील समास' विचारावरूनच आलेला आहे. म्हणून संस्कृतातील समासविचाराधारेच अर्धमागधीतील समासविचार पुढे केला आहे. २८९ समास
__ अनेक शब्दांतील परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा त्या शब्दांचा इतर वस्तूंशी संबंध दाखविणारे शब्द अथवा विभक्ति प्रत्यय लुप्त होऊन, अर्थामध्ये बदल न होता त्यांच्या संयोगाने व्याकरणदृष्ट्या जे एक विशिष्ट पद सिध्द होते त्यास सामासिक शब्द वा समास म्हणतात. उदा. चोरभयं, दंडहत्थो इ. २९० समासाची सामान्य वैशिष्ट्ये
१) समासात आलेल्या घटक-शब्दांचा परस्पर संबंध वा त्यांचा इतर वस्तूंशी असणारा संबंध समासात प्रत्यक्षपणे व्यक्त झालेला असत नाही तथापि १ प्राकृतमधील समासांच्या अधिक व थोड्या फार परंपरा-भिन्न माहितीसाठी Nominal
Composition in Middle Indo-Aryan by G. V. Davane हा ग्रंथ पहाण्यास हरकत नाही. तादृश एवात्र तु समासाः। मार्कं ८.३४ अर्धमागधीतील समासघटना जरी थोड्याफार प्रमाणात संस्कृतसारखी आहे, तरी समासातील यंदाचा क्रम व समासाचा अन्त या बाबतीत अर्धमागधीतील समासात कधी कधी भिन्नता आढळते. उदा. तडिविमल सरिस (विमलतडिसरिस), पंचासवपरिन्नाया (परिन्नायपंचासवा) परीसह रिऊदंता (दंतपरीसहरिऊ), चउक्कसायावगए (अवगयचउक्कसाए), आइण्णजणमणुस्सा (जणमणुस्साइण्णा)