________________
प्रकरण १८ : साधित शब्द : तद्धित प्रक्रिया
२९९
पुरवणी अर्धमागधीतील इतर तद्धित शब्द :
(अ) अर्धमागधीतील इतर तद्धित शब्द संस्कृतमधून वर्णान्तराने अर्धमागधीत येतात.
(१) भाववाचक नामे :- गारव (गौरव), मद्दव (मार्दव), जोव्वण (यौवन), मोण (मौन), सुंदर (सौंदर्य) इत्यादी.
(२) अपत्यार्थी :- वासुदेव, माहेसर (माहेश्वर), माणव, दोवई (द्रौपदी), दोहित्ती (दौहित्री), दाणव (दानव) इत्यादी.
(३) पित्रर्थी :- पियामह, मायामह इत्यादी. (४) विकार, प्राचुर्य :- जलमय, अन्नमय.
(५) त्याचा तेथील या अर्थी :- वेसालिय (वैशालीचा), अज्झत्थिय (आध्यात्मिक), आरिस (आर्ष), साहाविय, माणसिय, पारलोइय, सारीरिय, पेइय (पैतृक), लोइय (लौकिक) इत्यादी.
(आ) काही संस्कृतमधील ताधितांची आदेशवजा अनियमित रूपे होतात. यावत्-जेत्तिअ, जेद्दह; एतावत्-एत्तिअ, एद्दह; कियत्-केत्तिअ, केद्दह'.
१
मार्कं. ४.६४