________________
२९८
अर्धमागधी व्याकरण
(ख) व.का.धा.वि. ची :(१) असहमाण, अकहती, अकरित, अविकंपमाण, अदित (२) अणिच्छमाण, अणालवंती.
(ग) क.भू.धा.वि. ची :(१) अकय, अबुद्ध, अणियय (अनियत), अकंत (अकांत) (२) अणागय, अणुव्विग्ग, अणणुन्नाय, अणुब्भूय (अनुद्भूत)
(घ) वि.क.धा.वि. ची :(१) असज्झ, अकहणिज, अलघणीय, अचिंतणीय, अकराणिज्ज (२) अणइक्कमणिज्ज
(३) ल्यबन्तांची' :(१) अगच्छित्ता, अदटूण, अकहिऊण, अगणिऊण, अभुंजिऊण. (२) अणापुच्छित्ता, अणवेक्खिऊण, अणापुच्छिऊण, अणालोचिऊण.
तुमन्ताच्या बाबतीतही अकरणरूपे वरीलप्रमाणेच होतात :- अचिंतेउं (नाण. १.२२३), इत्यादी. पण यावेळी प्रायः तुमन्तांचा उपयोग ल्यबन्ताप्रमाणे आढळतो.