________________
प्रास्ताविक
२२
९) प्रस्तुत व्याकरणातील वर्ण्य विषय
सोईसाठी व्याकरणातील वर्ण्य विषयाचे पाच विभाग पाडता येतात. ते असे १) भाषेचा उपयोग बोलणे, लिहिणे व वाचणे यासाठी होतो. या तीनही बाबतीत संपूर्ण अर्थबोध होण्यास वाक्यांची गरज असते. परस्परसंबंधयुक्त अशा अनेक शब्दांनी वाक्य बनते. शब्द हे एक किंवा अनेक अक्षरांच्या एकत्र येण्याने सिद्ध
नाटकात देव, राजे, ब्राह्मण (इत्यादी अ-नीच पात्रे) संस्कृत बोलतात, इतर (नीच) पात्रे (संस्कृतेतर) प्राकृत बोलतात. नाटकात जे जे लोक प्राकृत बोलतात ते सर्व लोक दर्शविण्यास संस्कृत भाषेत एक शब्द आहे तो म्हणजे 'प्रकृति'. प्रकृति शब्दाने राजाचे प्रजाजन, नागरिक इत्यादी तसेच स्त्रिया निर्दिष्ट होतात. 'प्रकृति' मध्ये ब्राह्मण व क्षत्रिय यांचा मात्र अंतर्भाव होत नाही. अशा प्रकारे स्त्रिया, प्रजाजन यांची भाषा 'प्राकृत' या शब्दाने दर्शविली जाऊ लागली.'
प्राकृत शब्द कसा प्रचारात आला असावा याबाबत पुढीलप्रमाणे आणखी एक उपपत्ती देता येईल : संस्कृत व प्राकृत हे दोन्ही शब्द उपसर्ग सहित 'कृ' या धातूची क. भू. धा. वि. आहेत. संस्कृत (सं.+कृ) म्हणजे (व्याकरण इत्यादींनी) शुध्द केलेली (भाषा) व प्राकृत (प्र+आ+कृ) म्हणजे फार (प्र.) विरूद्ध (म्हणजे भिन्न) (आ) केलेली भाषा तेव्हा संस्कृतपासून काही भाषांचे भिन्नत्व दाखविण्यास प्राकृत' या शब्दाचा वापर सुरू झाला असावा. साहजिकच प्राकृत म्हणजे संस्कृततेतर भाषा हा अर्थ पुढे बराच रूढ झाला.
कधी एका शब्दानेही वाक्य होऊ शकते. उदा. जा, ये, बैस, पड इ. २ वाक्यं स्याद् योग्यताकाङ्क्षासक्तियुक्तः पदोच्चयः। साहित्यदर्पण
केवल स्वर किंवा व्यंजनयुक्त स्वर ह्यास अक्षर म्हणतात. मध्ये स्वर नसताना पण अन्ती असता दोन (वा अधिक) व्यंजने एकत्र येऊन संयुक्ताक्षर वा जोडाक्षर होते.