________________
२८
अर्धमागधी व्याकरण
८) अर्धमागधी व्याकरणाचे स्वरूप :
प्राकृत व्याकरणाचे ‘बहुलत्व' हे जे वैशिष्ट्य परि. ४ मध्ये उल्लेखिले आहे, ते अर्धमागधी व्याकरणालाही लागू पडते. हेमचंद्र सांगतो 'आर्षं प्राकृतं बहुलं भवति।' (१.३) आणि माहाराष्ट्री-व्याकरणाचे सर्व नियम अर्धमागधीत विकल्पाने लागतात. (आर्षे हि सर्वे विधयो विकल्प्यन्ते । हेम १.३) १
नाहीत. परंतु व्याकरण, काव्य, नाटक इत्यादीत माहाराष्ट्रीचे जे स्वरूप दिसते त्याहून श्वेतांबर जैनांच्या प्राकृतभाषेच्या स्वरूपाचे काही भेद लक्षात घेऊन आधुनिक पाश्चात्य विद्वानांनी श्वेतांबर जैनांच्या ग्रंथभाषेला 'जैन माहाराष्ट्री' हे नाव दिले आहे. (पा स. म. प्रस्तावना, पृ. ३२) ‘जिला प्राकृत-पंडित जैन माहाराष्ट्री म्हणतात. ती आगम - भाषेचेच (canonical language) अखंडित चलन (Unbroken countinuation) होय. ( घाटगे पृ ४) 'प्राकृत व्याकरणात सांगितलेली माहाराष्ट्रीची लक्षणे तसेच अर्धमागधीची काही वैशिष्टये जैन माहाराष्ट्रीत आढळतात ( पा स. म. प्रस्तावना, पृ. ३२) तीर्थंकरांची चरित्रे, प्राचीन मुनींची चरित्रे, कथा, दर्शन, तर्क, ज्योतिष, भूगोल इत्यादी विषयांवरील ग्रंथ तसेच निर्युक्ति, भाष्ये, चूर्णी व टीकाग्रंथ हे जैन माहाराष्ट्रीत आहेत. उदा. पउमचरिय, उपदेशमाला, निशीथचूर्णी, धर्मसंग्रहणी, समराइच्चकहा, सुपासनाहचरिअ इ. (पा स. म., प्रस्ता, पृ. ३२ पहा )
“It (= आर्ष) can not be brought under strict rules and all its rules are only permissive, not compulsory" होएर्ले संपादित चंडकृत प्राकृतलक्षण, प्रस्तावना पृ. १८
प्राकृत शब्दाचा वापर कसा प्रचारात आला असावा याबद्दल इटलीतील मिलान विद्यापीठाचे एक प्राध्यापक विट्टोर पिसानी (Vittore Pisani) (बेलवलकर फेलिसिटेशन' व्हॉल्यूम पृ. १८५-१८९) यांनी पुढील उपपत्ति सुचविली आहे. 'एकाच वेळी अनेक भाषांचा ज्यात उपयोग केला जाई असा वाङ्मयप्रकार फक्त एकच. तो म्हणजे नाटक.