________________
प्रास्ताविक
२७
अकरा अंगग्रंथांचे संकलन करण्यात आले. दक्षिणेत आलेल्या साधूंवर इतकेच नव्हे तर त्यांच्या कंठस्थित सूत्रभाषेवरसुद्धा माहाराष्ट्रीचा प्रभाव पडला असावा. यांतील काही साधु पाटलिपुत्राच्या संमेलनात उपस्थित होते. साहजिकच संकलित अंगग्रंथांवर माहाराष्ट्रीचा प्रभाव पडला असावा. २) माहाराष्ट्री ही फार पूर्वीपासून वाङ्मयाची भाषा झालेली होती व तीने इतर देशी (Vernacular) भाषांवर वर्चस्व मिळविले होते. साहजिकच आपली भाषा माहाराष्ट्रीशी जितकी जुळती करता येईल तितकी जुळती करण्याचे कुणीही पसंत केले असते.
कारण काहीही असो अर्धमागधी ही माहाराष्ट्रीला बरीच जवळ आहे यात शंका नाही. 'आपल्या प्राकृत व्याकरणात हेमचंद्र अर्धमागधीचे स्वतंत्रपणे विवेचन करीत नाही, याचेही कारण हेच असावे. एवं च भाषा या दृष्टीने अर्धमागधी ही प्राधान्याने माहाराष्ट्री४ आहे. तसेच मागधीची अगदी थोडी वैशिष्ट्ये अर्धमागधीत सापडतात६. आता अर्धमागधी ही जरी प्रामुख्याने माहाराष्ट्री आहे तरी त्रिविक्रमाने म्हटल्याप्रमाणे (स्वतंत्रत्वाच्च भूयसा ।) जे माहाराष्ट्रीत आढळत नाही असे अर्धमागधीचे स्वतःचे असे बरेच आहे.
१) पा. स. म., प्रस्तावना, पृ. १९ - २०, २७ २) जैन, पृ. ४०
३) पटवर्धन, पृ. ६६ माहाराष्ट्रीहून अर्धमागधीची जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, तेवढीच हेमचंद्र देतो.
४) माहाराष्ट्रीमिश्रा अर्धमागधी । क्रमदीश्वर
५ )
वैद्य, पृ. ८
६) वूल्नरच्या मते (पृ. ६) शूरसेन व मगध यामधील प्रदेशातील भाषेवर अर्धमागधी ही आधारलेली आहे. डॉ. गुणे (प. २१६) म्हणतात की अर्धमागधी ही शौरसेनी व मागधी यामधील भाषा असल्याने तिच्यात या दोहोंचीही वैशिष्ट्ये आढळतात.
७) प्रस्तुत ग्रंथात डॉ. घाटगे (पृ. ४) यांनी केल्याप्रमाणे, अर्धमागधी व जैन माहाराष्ट्री या दोहोंचे स्वरूप एकत्रपणे सांगितले आहे. 'जैन माहाराष्ट्री' या नावाने एखाद्या प्राकृत भाषेचा निर्देश भारतीय प्राकृत-वैयाकरण करीत