________________
अर्धमागधी व्याकरण
सा असमाश्रितस्वकीयसमग्रलक्षणा अर्धमागधी इति उच्यते,' हे अभयदेवांचे वचन या म्हणणाऱ्या पुष्टिकारक आहे.१
६) अर्धमागधी या नावाचे स्पष्टीकरण
वरील विवेचनाच्या अनुरोधाने, ‘मागधीचे अर्धे स्वरूप जिच्यात आहे.' (अर्धं मागध्याः) ती अर्धमागधी, असे अर्धमागधी या शब्दाचे एक स्पष्टीकरण दिले जाते. 'अर्धमागधी भाषा यस्यां रसोर्लशौ मागध्यां इत्यादिकं मागधभाषालक्षणं परिपूर्णं नास्ति.' हे अभयदेवाचे वचन याला पुष्टिदायक आहे. अर्धमागधी या नावाचे दुसरे एक स्पष्टीकरण असे दिले जाते. 'अर्ध्या मगध देशात प्रचलित असलेली ती अर्धमागधी.'
'मगहद्धविसयभासाणिबद्धं अद्धमागहं,' हे जिनदासगणीचे वचन याला पुष्टीदायक आहे.
७) अर्धमागधी व माहाराष्ट्री :
__ परंतु उपलब्ध जैनागम ग्रंथात अर्धमागधीचे जे स्वरूप दिसते. त्याचे मागधीपेक्षा माहाराष्ट्रीशीच अधिक साधर्म्य आढळते. याची कारणे अशी दिली जातात.
१) इ. स. पूर्वी ३१० च्या सुमारास मगधात १२ वर्षे मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी बरेच जैन साधु दक्षिणेत आले. यावेळी सूत्रग्रंथाचा अभ्यास अशक्य झाल्याने पुष्कळसा भाग विसरला गेला. पुढे दुष्काळ संपल्यावर पाटलिपुत्रात
१
हेमचंद्रसुध्दा (४.२८७) म्हणतो : यदपि पोराणमद्धमागहभासानिययं हवइ सुत्तं इत्यादिना आर्षस्य अर्धमागधभाषानियतत्त्वं ऑम्नायि वृध्दः तदपि प्रायः अस्यैव विधानात् न वक्ष्यमाणलक्षणस्य। मध्य असंयुक्त र चा ल् होणे, अकारान्त पुल्लिंगी शब्दांचे प्रथमा ए. व. एकारान्त असणे, ह्या अर्धमागधीत आढळणाऱ्या मागधीच्या लक्षणापुरते हे स्पष्टीकरण बरोबर ठरेल. महावीरांचे भ्रमण व जैन धर्माचा उत्तरकालीन इतिहास यांची आपणास जी माहिती आहे, त्यावरूनही हे स्पष्टीकरण संभवनीय ठरते. (घाटगे पृ. ३)