________________
प्रास्ताविक
जमलेल्या सर्वांना समजेल अशा त्या त्या भाषेत परिणत होत असे२. असेही जैन धर्मग्रंथात सांगितलेले आहे. आता ही जरी अतिशयोक्ति मानली तरी तिच्या बुडाशी काहीतरी सत्य असावे आणि हे ऐतिहासिक सत्य असे असावे. महावीर हे मगधचे रहिवासी असल्याने त्यांची मातृभाषा मागधी असली पाहिजे. पुढे जेव्हा त्यांनी धर्मोपदेशास सुरवात केली, तेव्हा त्यांना कळून आले असावे की सर्वांना समजण्याइतकी मागधी ही सार्वजनीन नाही. त्या काळी भारतात प्रचलित असलेल्या आर्य (प्राकृत) भाषांत फारसा मोठा फरक नसल्याने, भिन्न भाषिकांना सुद्धा आपला धर्मोपदेश समजावा म्हणून महावीरांनी इतर भाषांचीही (काही) वैशिष्ट्ये मागधीत अंतर्भूत केली असावीत३. म्हणजेच मगधानजीकच्या देशात प्रचलित असलेल्या विविध भाषांची काही वैशिष्ट्ये मागधीत अंतर्भूत करून, परंतु त्याचवेळी मागधीची बरीचशी वैशिष्ट्ये तशीच कायम ठेऊन महावीराने मागधीला सार्वजनीन करण्याचा प्रयत्न केला असावा आणि मग या भाषेला अर्धमागधी हे नाव मिळाले असावे; कारण ही भाषा संपूर्ण मागधी नव्हती तर अंशतः५ होती. 'या मागधी नाम भाषा रसोर्लशौ मागध्यां इत्यादी लक्षणवती
देवेन्द्र या टीकाकाराने उद्धृत केलेला श्लोक पहा. देवा दैवीं नरा नारीं शबराश्चापि शाबरीम्। तिर्यञ्चोऽपि च तैरश्ची मेनिरे भगवगिरम्।। सा वि य ण अद्धमागही भासा भासिज्जमाणी तेसिं सव्वेसिं आरियमणारियाणं दुप्पयचउप्पयमित्तपसुपक्खिसरीसिवाणं अप्पप्पणो हियसिवसुहदाय भासत्ताए परिणमइ । (समवायांग) सा वि य णं अद्धमागहि तेसिं सव्वेसिं
आरियमणारियाणं अप्पणो सभासाए परिणामेणं परिणमइ (औपपातिक), तसेच सर्वार्धमागधी सर्वभाषासु परिणामिनीम् (वाग्भट काव्यानुशासन), जयइ जिणिंदाण असेसभासापरिणामिणी वाणी। (हेमचंद्रकृत दे. ना. मा.
१.१)
४
जैन, पृ. ३९ 'अठ्ठारसदेसीभासाणिययं वा अद्धमागहं' हे जिनदासगणीचे वचन या सार्वजनीनत्वाला पुष्टिकारक आहे. पटवर्धन, पृ. ६५
५