________________
२४
अर्धमागधी व्याकरण
लागू होतात; त्यांना अनेक अपवाद' इत्यादी असतात.
५) अर्धमागधी :
श्वेतांबर जैनांच्या आगमग्रंथाची भाषा अर्धमागधीरे आहे. संस्कृत ही जशी देवांची भाषा मानली जाते. तद्वत् जैन लोकसुद्धा अर्धमागधीला देवांची५ भाषा मानतात.
श्वेतांबर जैनांचे काही सूत्रग्रंथ सांगतात की भगवान् महावीर हे अर्धमागधी भाषेत धर्मोपदेश करीत असत आणि अर्धमागधी ही इतकी सुलभ असे की ती पशुपक्ष्यादिकांनाही समजत असे. इतकेच नव्हे तर महावीरांचा धर्मोपदेश ऐकण्यास
१
m
'बहुल' चे स्पष्टीकरण करताना हेमचंद्र (१.२) म्हणतो. क्वचित् प्रवृत्तिः क्वचिद् अप्रवृत्तिः क्वचिद् विभाषा क्वचिद् अन्यदेव भवति । स्थानांग (पसत्था इसिभासिआ) व अनुयोगद्वार (पसत्था इसिभासिता) या जैन सूत्रग्रंथात अर्धमागधीला 'ऋषिभाषिता' म्हटलेले आहे. हेमचंद्र अर्धमागधीला ‘आर्ष' हे नामाभिधान देतो. जैनागमग्रंथांची अर्धमागधी म्हणजे संस्कृतनाटकात आढळणारी अर्धमागधी नव्हे, हे भिन्नत्व दाखविण्यास हिला 'जैन अर्धमागधी' असेही म्हणतात. (चौक्षी, पृ. १९) या भाषेला याकोबी 'जैन प्राकृत' म्हणतो तर पं. बेचरदास प्राकृत (= माहाराष्ट्री) म्हणतात. पण जैनागमातील वचनांना अनुसरून या भाषेला अर्धमागधी म्हणणे हे योग्य ठरेल. संस्कृतं नाम दैवी वागन्वाख्याता महर्षिभिः। दंडीचा काव्यादर्श १.३३ देवाणं अद्धमागहाए भासाए भासंति । (भगवतीसूत्र) आरिसवयणे सिद्धं देवाणं अद्धमागहा वाणी। (पासम, प्रस्तावना, प. २१) भगवं च णं अद्धमागहीए भासाए धम्ममाइक्खइ । (समवायांग) तए णं समणे भगवं महावीरे ... अद्धमागहाए भासाए भासइ । औपपातिक (पासम प्रस्तावना पृ. १९)
४ ५
६