________________
प्रास्ताविक
२३
या प्राकृतांचा अभ्यास संस्कृतच्या संदर्भातच करावयास हवा. या प्राकृतांच्या पुढील विकास विस्तारातूनच आधुनिक भारतीय आर्यभाषा मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती इत्यादी निर्माण झाल्या आहेत. साहजिकच संस्कृत व अर्वाचीन भारतीय आर्यभाषा यांना जोडणारा दुवा म्हणजे प्राकृतभाषा होय हे म्हणणे सयुक्तिकच ठरते. अर्थात् संस्कृत आणि अर्वाचीन भारतीय आर्यभाषा ३ यांच्या संदर्भात प्राकृतांचा अभ्यास करणे योग्य होईल.
४) प्राकृत व्याकरण व त्यांचे स्वरूप :
सर्व प्राकृतात माहाराष्ट्री ही अत्यंत महत्त्वाची असल्याने प्राकृत वैयाकरण माहाराष्ट्रीला जास्त प्राधान्य देतात. प्रथमत: ते तिच्या संपूर्ण स्वरूपाचा आविष्कार करतात; मग इतर प्राकृतांचे माहाराष्ट्रीहून जे विशिष्ट' भेद आहेत तेवढ्यांचाच ते निर्देश करतात.
हेमचंद्राने (१.२) म्हटल्याप्रमाणे प्राकृतव्याकरणाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते ‘बहुल’ आहे. म्हणजे व्याकरणात सांगितलेले नियम ढोबळमानाने
१
२
३
४
याचे आणखी एक कारण असे देता येईल. प्राकृतमधील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक शब्दांचे मूळ संस्कृतमध्ये आढळते.
या शब्दाने द्रविडी भाषासमूहाची व्यावृत्ति होते.
प्रस्तुत पुस्तकात मराठीशी संबंध दाखविला आहे.
पहा : तत्र सर्वभाषोपयोगित्वात् माहाराष्ट्री भाषाऽनुशिष्यते । (मार्कं) सर्वासु भाषास्विह हेतुभूतां भाषां महाराष्ट्रभवां पुरस्तात्। निरूपयिष्यामि यथोपदेश श्रीरामशर्माहमिमां प्रयत्नात् । (रामतर्कवागीश ) (पावगी, पृ. ७)
जरी विविध प्राकृतभाषांतील भेद - ज्यायोगे त्यांचा परस्पर भेद दाखविता येतो. वैयाकरणांनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत, तरी प्रत्यक्ष लेखनात मात्र लेखकांनी या भेदांची फार कटाक्षाने दखल सदा घेतली असे नाही. त्यामुळे वाङ्मयीन प्राकृत ही भिन्न प्राकृतांच्या वैशिष्ट्यांचे एक अवियोज्य परस्पर मिश्रणच झाली आहे. (घाटगे,
पृ. ३)