________________
२२
अर्धमागधी व्याकरण
संस्कृत' झाली. या मताचा थोडक्यात निष्कर्ष हा की संस्कृत भाषा ही प्राकृतचे मूळ नव्हे.
२) याउलट, इतर पंडितांच्या मते, प्राकृत हा शब्द प्रकृति या शब्दापासून साधलेला असून प्रकृति शब्दाने संस्कृत भाषा र निर्दिष्ट आहे. म्हणजेच प्रकृति संस्कृतमधून निर्माण झालेली ती प्राकृत होय. हेमचंद्र, मार्कंडेय इत्यादी प्राकृत वैयाकरण व इतर काही विद्वान् यांनी या मताचा पुरस्कार केलेला आहे. ३) प्राकृतचा अभ्यास :
वरील मतातील कोणतेही मत खरे असो, भारतीय वैयाकरणांनी४ केल्याप्रमाणे
या दृष्टीने प्राकृत शब्दाची पुढील स्पष्टीकरणे पहावी १) प्रकृत्या स्वभावेन सिद्धं प्राकृतम् । २) प्रकृतीनां साधारणजनानाम् इदं प्राकृतम्। ३) सकल जगज्जन्तूनां व्याकरणादिभिः अनाहितसंस्कारः सहजो वचनव्यापारः प्रकृतिः तत्र भवं सा एव वा प्राकृतम् । आरिसवयणे सिद्धं देवाणं अद्धमागहा वाणी इत्यादी वचनात्, वा प्राक् पूर्वं कृतं प्राक्कृतं बालमहिलादिसुबोधं सकलभाषानिबन्धनभूतं वचनम् उच्यते । पाणिन्यादिव्याकरणोदितशब्दलक्षणेन संस्करणात् संस्कृतम् उच्यते । ( रूद्रकृत काव्यालंकार २.१२ वरील नमिसाधूची टीका ) संस्कृतरूपायाः प्रकृतेरूत्पन्नत्वात् प्राकृतम्। पावगी, पृ. १४
१) हेमचंद्र : प्रकृतिः संस्कृतम् । तत्र भवं तत आगतं वा प्राकृतम्। (२) मार्कंडेय : प्रकृतिः संस्कृतम् । तत्र भवं प्राकृतम् उच्यते । (३) (दशरूपक २.६० वर) धनिक : प्रकृतेः आगतं प्राकृतम्। प्रकृतिः संस्कृतम्। (४) प्राकृतचंद्रिका : प्रकृतिः संस्कृतम् । तत्र भवत्वात् प्राकृतं स्मृतम्। (५) षड्भाषाचंद्रिका : प्रकृतेः संस्कृतायाः तु विकृतिः प्राकृति मता। (६) प्राकृतसंजीवनी : प्राकृतस्य तु सर्वम् एव संस्कृतं योनिः। ४ प्राकृत शब्दाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी पहा :
५
के. वा. आपटे 'प्राकृत शब्दाचा अर्थ, मराठी संशोधन ९, मराठी संशोधन मंडळ, मुंबई, १९७७
उपलब्ध असलेले प्राकृत व्याकरण-ग्रंथ हे संस्कृतमध्येच आहेत, हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे.