________________
२९२
अर्धमागधी व्याकरण
शेवटचा :- अंत' (अन्त्य), अंतिम, चरिम. (आ) क्रमवाचक क्रियाविशेषण अव्यये :
वर सांगितलेली क्रमवाचक विशेषणे नपं.द्वि.ए.व. त योजिली की ती क्रमवाचक क्रियाविशेषणांचे कार्य करतात.
पढमं (पहिल्यांदा), दोच्चं (दुसऱ्यांदा) इत्यादी. (इ) समूहवाचक नामे :अर्धमागधीत पुढील समूहवाचक नामांचा उपयोग आढळतो.
दुग, दुय (द्विक), तिय (त्रिक), चउक्क (चतुष्क), ण्णगरे (पंचक), छक्क (षट्क), दसग (दशक).
(ई) प्रकारदर्शक विशेषणे :
संख्यावाचकांना ‘विह' (विध) हा प्रत्यय जोडून प्रकारदर्शक विशेषणे सिद्ध होतात.
एगविह, दुविह, तिविह; चउविह, चउव्विह; पंचविह, छव्विह, सत्तविह, अट्ठविह, नवविह, दसविह; दुवालसविह (१२ प्रकारचे), सोलसविह, अट्ठावीसइविह, बत्तीसइविह, पणयालीसविह (४५ प्रकारचे) इत्यादी.
(उ) प्रकारदर्शक अव्यये :संख्यावाचकांना 'हा' (धा) प्रत्यय जोडून प्रकारदर्शक अव्यये होतात.
दुहा, तिहा, चउहा, पंचहा, छहा, सत्तहा, अट्टहा, नवहा, दसहा; दुवालसहा, बारसहा; सयहा (शत).
(ऊ) आवृत्तिवाचक अव्यये :
क्रिया किती वेळा झाली हे दर्शविणारी आवृत्तिवाचक अव्यये संख्यावाचकांपासून साधिली जातात. त्यातील एक ते तीन पर्यंतची अनियमित आहेत, ती अशी :
१ पा. स. म., पृ. १० २ ही समूहवाचके संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली आहेत. ३ सुपास, ५३६, ५८०, ५१७. ४ तसेच, अणेगविह, नाणाविह, विविह. ५ तसेच, बहुहा, अणंतहा.