________________
प्रकरण १८ : साधित शब्द : तद्धित प्रक्रिया
२९१
इ) संस्कृतमध्ये तर व तम हे प्रत्यय ‘इष्ठ' प्रत्ययान्त शब्द व अव्यये यांनाही लागतात. अशी अर्धमागधीतील काही रूपे :
जेट्ठयर, कणिट्ठयर, पाविट्ठतर'; सुट्टयर, भुज्जतर. २८५ संख्यावाचक साधिते
संख्यावाचक विशेषणापासून नामे, विशेषणे व अव्यये साधता येतात. ही साधनिका पुढीलप्रमाणे :
(अ) क्रमवाचक संख्याविशेषणे :
एक, दोन इत्यादी संख्यावाचकांवरून पहिला, दुसरा इत्यादी क्रमदर्शक संख्यावाचके साधिली जातात. त्यातील एक ते सहा पर्यंतची अनियमित आहेत, ती अशी :
पढम'; बीय, बिइय, दुइय, दोच्च, दुच्च, दुइज्ज; तइय, तच्च; चउत्थ', चउ?; पंचम; छ?.
सात व सातच्या पुढील संख्यावाचके यांना 'म' हा प्रत्यय जोडून क्रमवाचके सिद्ध केली जातात.
सत्तम, अट्ठम, नवम, दसम, एक्कारसम (११वा); बारसम, दुवालसम (१२ वा); तेरसम (१३ वा); चउद्दसम, चोद्दसम (१४ वा); पन्नरसम (१५ वा); सोलसम (१६ वा); सत्तरसम (१७ वा), अट्ठारसम, अढारसम (१८ वा), एगूणवीसम, एगूणवीसइम (१९ वा); वीसइम (२० वा); एगवीसइम (२१ वा); बावीसइम (२२ वा); तेवीसइम (२३ वा); चउवीइम (२४ वा); तीसइम (३० वा); चोत्तीसइम (३४ वा); चत्तालीसइम (४० वा); पण्णासम (५० वा); पन्नपन्नइम (५५ वा); असीइम (८०वा); चउरासीइम (८४); पंचासीइम (८५ वा) इत्यादी.
on mo 3
१ ३ ४ ५ ६
वा. वे. आपटे, पृ. ५०
२ कथा. पृ. ११४ तसेच पढमिल्ल, पढमिल्लग; आइ (आदि); अग्गिम (अग्रिम) (पहिला) म. :- दुजा तसेच 'तुरिय' (तुर्य), चौथा. कधी कधी हा 'म' प्रत्ययरहित क्रमवाचके सुद्धा आढळतात. उदा. तीस (३० वा); अउणापन्न (४९ वा), वीस (२० वा), चउवीस (२४ वा) इत्यादी.