________________
२९०
२८४ विशेषणांचा तर-तम-भाव
पुढील प्रत्ययांच्या साहाय्याने विशेषणांचा तर - तम-भाव दाखविला जातो.
(अ) तर - भाव :
विशेषणांना तर, यर, तराग, यराग, तराय, यराय हे प्रत्यय जोडून तर भाव सिद्ध होतो.
(१) 'तर' प्रत्यय जोडून
अणिट्ठ-तर, कंततर, महत्तर, विसुद्धतर, सुंदरतर, थिरतर, उज्जलतर, पहाणतर (प्रधान), अप्पतर (अल्प), उच्चतर, गाढतर.
(२) 'यर' प्रत्यय जोडून
अप्पयर, दढयर, गाढयर, गरुययर (गुरु), तिक्खयर, नीययर ( नीच), करुणयर, सुंदरयर, सोहणयर.
(३) तराग, तराय प्रत्यय जोडून
पभूयतराग, अमणामतराग; अणिट्ठयराग, कंतयराग.
(४) तराय, यराय प्रत्यय जोडून
अमणामतराय, असुभतराय, हीणतराय; विसिट्ठयराय, अहिययराय (अधिक). टीप :- संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली काही तर - वाचके अशी सेयं (श्रेयस्), पावीयंस (पापीयस् ), कणीयस ( कनीयस् ) . ' उत्तरतर' या शब्दात दोनदा तर - वाचक प्रत्यय आहे'.
१
:
:
पिशेल. पृ. २९२
अर्धमागधी व्याकरण
:
(आ) तम-भाव :
विशेषणांना तम, यम हे प्रत्यय जोडून तम-भाव सिद्ध होतो.
अणिट्ठतम, कंततम, महत्तम.
(१) 'तम' प्रत्यय जोडून (२) 'यम' प्रत्यय जोडून अप्पयम (अल्प), दढयम, पिययम. टीप :- संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली काही तमवाचके अशी सेट्ठ (श्रेष्ठ), जेट्ठ (ज्येष्ठ), कणिट्ठ (कनिष्ठ), पाविट्ठ (पापिष्ठ), दप्पिट्ठ ( दर्पिष्ठ), धम्मिट्ठ (धर्मिष्ठ), भूइट्ठ (भूयिष्ठ), गरिट्ठ ( गरिष्ठ), वरिट्ठ (वरिष्ठ).
:
:1
:
--