________________
२८६
अर्धमागधी व्याकरण
सावयत्तण समण (श्रमण)-समणत्तण, बाल-बालत्तण, सवत्ती-सवत्तित्तण, दारगदारगत्तण, विस-विसत्तण, माणुस-माणुसत्तण.
(२) विशेषणांना :- बहिर-बहिरत्तण, धरी-धरीत्तण, सुलभ-सुलभत्तण, विचित्त-विचित्तत्तण, तरल-तरलत्तण, दुजय-दुज्जयत्तण, तरुण-तरुणत्तण, परवसपरवसत्तण, गंभीर-गंभीरत्तण, बहुल-बहुलत्तण. (इ) या प्रत्यय जोडून :
(१) नामांना :- अलाभ-अलाभया, अलोभ-अलोभया.
(२) विशेषणांना :- सुकुमार-सुकुमारया, सम-समया (समता), असारअसारया, सढसील-सढसीलया (शठशीलता).
२८१ स्वामित्वदर्शक विशेषणे
पुढील प्रत्यय जोडून स्वामित्वदर्शक विशेषणे सिद्ध केली जातात. (१) वंत:- भगवंत, दयावंत, उच्छाहवंत, धणवंत, गुणवंत
(२) मंतरे :- गंधमंत, फासमंत, मूलमंत, कंदमंत, पत्त मंत, फलमंत, वण्णमंत, रसमंत
(३) आल :- जडाल (जडा, जटा) रसाल (रस) सद्दाल (सद्द), धणाल (धण), दाढाल (दाढा, दंष्ट्रा) ।
(४) आलु :- दयालु (दया), ईसालु (ईसा) (क) आलु-इल्ल-उल्ल-आल-वन्त-मन्तेत्तेरमणा मतोः। हेम २.१५९ डॉ. वैद्यांनी 'इ' व 'सि' असे आणखी दोन प्रत्यय दिलेले आहेत. परंतु ते तसे स्वतंत्र मानण्याचे कारण नाही. मूळ संस्कृतशब्दावरून असे शब्द वर्णान्तराने अर्धमागधीत आले आहेत.
उदा.
(अ) धणि (धनिन्), हत्थि (हस्तिन्), करि (करिन्), अत्थि (अर्थिन्). (आ) ओयंसि (ओजस्विन्), तेयंसि (तेजस्विन्), जसंसि (यशस्विन्), मणंसि (मनस्विन्)
'नहंसि' (नख) हा शब्द अयोग्य सादृश्याने. (ख) म. :- हत्ती, धनी, मायावी, अर्थी, तेजस्वी, यशस्वी इत्यादी. २ 'वंत' प्रत्ययान्त विशेषणांचा वापर अर्धमागधीत बराच कमी आहे. (सेन, पृ. १२४) ३ कधी “क्वचिद् भूम्नि वा मतुष्प्रत्ययः।” मलयगिरी, राय. पृ. १२. ४ म. आळ' प्रत्यय :- रसाळ, रवाळ इत्यादी. ५ म. आळु' प्रत्यय :- दयाळु, मायाळु, कृपाळु, पायाळु, स्नेहाळु, कनवाळु.