________________
प्रकरण १८) साधित शब्द : तद्धित प्रक्रिया
888888888888888888888888888888888888888888888888888888
२७९ प्रास्ताविक
नाम, सर्वनाम, विशेषण यांना प्रत्यय लागून नामसाधिते' अथवा तद्धिते सिद्ध होतात. हे साधित शब्द नाम, विशेषण, अव्यय असे तीन प्रकारचे असू शकतात. अर्धमागधीतील अशा शब्दांची साधनिका पुढे क्रमाने दिली आहे'.
२८० भाववाचक नामे
नाम व विशेषण यांना 'त' (त्व), ‘त्तण' अथवा 'या' (ता) प्रत्यय जोडून भाववाचक नामे सिद्ध होतात. (अ) 'त्त' प्रत्यय जोडून :
(१) नामांना :- मूल-मूलत्त, देव-देवत्त, कंद-कंदत्त, वाणर (वानर)वाणरत्त, अगव्व (अगर्व)-अगव्वत्त, दास-दासत्त, फल-फलत्त, पुप्फ-पुप्फत्त, सीह-सीहत्त, मच्छ (मत्स्य)-मच्छत्त, पुरिस-पुरिसत्त.
(२) विशेषणांना :- असार-असारत्त, वंक-वंकत्त, धुत्त-धुत्तत्त, कुसलकुसलत्त, भद्द-भद्दत्त, महुर-महुरत्त; महत्तरग-महत्तरगत्त; मम-ममत्त, निम्मम (निर्मम)-निम्ममत्त. (आ) त्तण प्रत्यय जोडून :
(१) नामांना :- तक्कर-तक्करत्तण, धम्म-धम्मत्तण, सावय (श्रावक)
www
१ येथे नाम शब्द, सर्वनाम व विशेषण यांचे उपलक्षण आहे.
सोईसाठी त्या त्या शीर्षकाखाली ही तद्धिते येथे दिलेली आहेत. ३ क्वचित् अव्ययांना :- मिच्छत्त (मिथ्यात्व), नाणत्त (नानात्व)