________________
२८०
अर्धमागधी व्याकरण
उक्खिव-उक्खिवित्तु, पविस-पविसित्तु, छिंद-छिंदित्तु, कड्ड-कड्डित्तु, उत्तर-उत्तरित्तु, थुण-थुणित्तु.
(आ) (इतर धातूंना) :- सहेत्तु, विणएत्तु, आणेत्तु', उठेत्तु; ठवित्तु'; पयडित्तु.
(ख) ल्यबन्ताच्या वर सांगितलेल्या नेहमीच्या प्रत्ययाखेरीज इतर काही प्रत्यय लागूनही ल्यबन्ते सिद्ध होतात. हे प्रत्यय असे :
(१) इय, (इया') हे प्रत्यय जोडून :
(अ) अणुपाल-अणुपालिय, पेच्छ-पेच्छिय, थुण-थुणिय, वियाणवियाणिय, सुमर-सुमरिय, पास-पासिय, पेक्ख-पेक्खिय, मुण-मुणिय, भुंजभुंजिय, जाण-जाणिय, गह-गहिय, आरोव-आरोविय, अणुन्नव-अणुन्नविय.
(आ) वियाण-वियाणिया, परिजाण-परिजाणिया, पास-पासिया, उट्ठाउट्ठिया, अणुपस्स-अणुपस्सिया, अणुपाल-अणुपालिया
(२) इयाण, इयाणं हे प्रत्यय जोडून :
(अ) लह-लहियाण, घट्ट-घट्टियाण, आरुस-आरूसियाण, परिवज्जपरिवज्जियाण
(आ) तक्क-तक्कियाणं, उस्सिंच-उस्सिचियाणं, समुपेह-समुपेहियाणं, आरुस-आरुसियाणं, अभिजुंज-अभिजुंजियाणं
(३) आए, (ए'), प्रत्यय जोडून :
पेह-पेहाए, अणुपेह-अणुपेहाए, उवेह-उवेहाए, संपेह-संपेहाए. उट्ठाए, परिन्नाए ( प्रति+ज्ञा), समायाए (सम्+आ+दा), आयाए (आ+दा), संखाए (सम्+ख्या), समुट्ठाए.
१ कधी ‘आणित्तु' (सुर. १२.२२०) २ प्रयोजक व नामधातू यांना लागते वेळचे विकारासाठी मागील टीप पहा.
_ पिशेलने म्हटल्याप्रमाणे (पृ.६९), पद्यांत वृत्ताच्या सोईसाठी ‘इय' चा ‘इया' होतो. ४ तसेच अजाइया (याच्)
डॉ. वैद्य (पृ.५३) यांनी 'ए' असा प्रत्यय दिला आहे. पण 'ए' प्रत्यय स्वतंत्र मानण्याऐवजी तो आए' च मानणे युक्त होईल. (म्हणून वर 'ए' प्रत्यय कंसात ठेवला आहे) व आकारान्त धातूंना लागताना आ आ आ असाच संधी होतो. हे म्हणता येईल.