________________
२६८
पुढील प्रत्यय' लावून कर्मणि धातू सिद्ध होतात. (अ) 'इज्ज' हा प्रत्यय प्राय: जोडून :
(१) थुण - थुणिज्ज, धर-धरिज्ज, सुमर (स्मृ ) - सुमरिज्ज, पूर-पूरिज्ज, पावपाविज्ज, कह-कहिज्ज, सलह ( श्लाघ्) - सलहिज्ज
२
गा-गाइज्ज, ने-नेज्ज, उवणे-उवणिज्ज, आणे - आणिज
(२) नामधातूपासून :- धवल-धवलिज्ज, कवल - कवलिज्ज, किसिण (कृष्ण) - किसिणिज्ज, कलुस-कलुसिज्ज, पसिण ( प्रश्न) - पसिणिज्ज, सद्दावेसद्दाविज्ज, मइल-मइलिज्ज.
अर्धमागधी व्याकरण
(३) प्रयोजकापासून :- प्रयोजक धातूंना ' इज्ज' प्रत्यय लागतांना त्यांच्या अन्त्य 'ए' चा लोप होतो, अन्त्य 'वे' असल्यास त्याचा 'व' होतो. ३
(१) कारे-कारिज्ज, हासे - हासिज्ज, मारे - मारिज्ज
(२) करावे - कराविज्ज, हसावे - हसाविज्ज, आणावे-आणाविज्ज, ण्हावेण्हाविज्ज.
२
(आ) कधी 'ईय' प्रत्यय जोडून :
निवेय-निवेईय, संभाव - संभवीय, पट्ठा-पइट्ठीय
२६३ कर्मणि धातू : अनियमित
अर्धमागधीत काही धातूंची कर्मणि अंगे अनियमित होतात. तसेच संस्कृतमधून वर्णान्तराने अर्धमागधीत आलेल्या कर्मणि धातूंनाही अनियमित म्हणण्यास हरकत नाही. ही अनियमित कर्मणि अंगे अशी :
(अ) आढप्प (आढव - सुरु करणे), छिप्प (छिव - स्पर्श करणे ), छुप्प ( छुव - स्पर्श करणे ), विढप्प (विढव - मिळविणे )
३
ईअ - इज्जौ क्यस्य । हेम. ३.१६०
एकारान्त व ओकारान्त धातूंपुढे 'इज्ज' प्रत्ययातील आद्य 'इ' चा लोप होतो. उदा. नेनिज्ज, नेज्ज. पण या धातू पुढे 'य' आला असल्यास 'नेइज्ज, होइज्ज' (पी. कुमार, पृ. १२,१५) अशी रूपे होतील.
लुगावीक्तभावकर्मसु । - णे: स्थाने लुक् आवि इत्यादेशौ भवतः क्ते भावकर्मविहि च प्रत्यये परतः । हेम. ३.१५२