________________
प्रकरण १५ : साधित शब्द : साधित धातू
२६७
हे धातू सिद्ध करण्यास अर्धमागधीत स्वतंत्र प्रक्रिया नाही. संस्कृतमधील च्वि धातू वर्णान्तराने अर्धमागधीत येतात.२
मूळ शब्दाने दर्शविलेली स्थिती होणे वा घडवून आणणे हा च्वि-धातूंचा अर्थ असतो.
उदा. - दूरीकरेमि, वसीकरेमि, अंगीकरेइ, विहलीकरेइ, सहलीकरेमि, गोयरीभवंति, थिरीहोइ, आउलीहोंति (वर्त.); खलीकरिउ, सहलीकरेसु (आज्ञार्थ); पयडीहोही (भविष्य.)
२६२ कर्मणि धातू मूळ धातू तसेच साधित धातू यांच्यापासून कर्मणि धातू साधता येतात.
सर्व कर्मणि धातू अकारान्त असल्याने ते प्रथम वर्गीय अकारान्त धातू प्रमाणे चालतात.
सर्व काळांत व अर्थांत कर्मणि धातूंची रुपे होतात. तसेच कर्मणि धातूपासून साधित शब्दही सिद्ध करता येतात.
१
नामांना व विशेषणांना 'ई' (च्वि) जोडून त्यापुढे अकर्मक धातू करताना 'भू' आणि सकर्मक धातू करताना 'कृ' जोडून 'मुळात तसे नसताना तसे होणे किंवा करणे अशा अर्थाचे धातू सिद्ध केले जातात. त्यांना संस्कृतमध्ये 'च्चि धातू' अशी संज्ञा आहे. च्चि धातूपासून साधित शब्दही तयार होतात. उदा. धवलीहूय, अंगीकय, किंकरीकय, आउलीहूय, पच्चक्खीभूय, पिंडीकय, वसीकय, नियडीहूय, (निकट), सहलीकय, उड्डीकय, पयडीभूय, समाउलीभूय, सत्थीकय (स्वस्थ), पबलीभूय, पयडीहूय, पच्चक्खीहूय, निरुत्तरीकय (क.भू.धा.वि.); आसण्णीहूय, अंगीकाऊण, पयडीहोऊण, थिरीकाऊण (ल्यबन्त); पच्चक्खीहोउं, पयडीकाउं (तुमन्त). कर्मणि धातूंचा उपयोग कर्मणि व भावे प्रयोगात केला जातो. उदा. वण्णिज्जइ, खज्जइ, वुच्चइ (वर्त.); मुच्चिसु (भूत.); उज्झिहिइ, मुच्चिहिइ (भविष्य.); सुव्वउ, सुमरिज्जउ, मारिज्जउ, पुच्छिजंतु (आज्ञार्थ); विणिहम्मेजा, मुच्चेज्जा (विध्यर्थ) उदा. वारिज्जत, खन्नमाण, गिव्हिज्जत, धरिज्जमाण, पेच्छिज्जमाण, पालिज्जत, नीणेज्जत, घुम्मत, आणिज्जमाण, (प्रयोजक कर्मणि धातूंपासून) भुंजाविजंत, कारिज्जत, कराविज्जंत; (नामधातूंचे कर्मणि-धातूंपासून) :- कंचुइज्जत, धवलिज्जत, धवलिज्जमाण (व.का.धा.वि.)
३