________________
प्रकरण १५ : साधित शब्द : साधित धातू
२६५
२६० नामधातू
नाम, सर्वनाम, विशेषण यांपासून नामधातू साधता येतात. मूळ शब्दांनी व्यक्त होणाऱ्या वस्तूची किंवा व्यक्तीची अभिलाषा करणे अथवा त्याप्रमाणे वागणे किंवा वागविणे ह्या अर्थी नामधातूंचा उपयोग होतो.
कधी मूळ शब्दांचाच धातू प्रमाणे उपयोग केला जातो, तर कधी मूळ शब्दांना प्रत्यय जोडून नामधातू साधले जातात.
नामधातूंचा उपयोग सर्व काळांत व अर्थांत करता येतो. (अ) मूळ शब्द धातू प्रमाणे :
(१) अप्पिण (अर्पण करणे), जम्म (जन्म घेणे), पच्चप्पिण (परत करणे), कवल (घास घेणे)
(२) सिढिलइ (शिथिल करतो), पीणंति' (पीण, पीन), लठ्ठ होतात, तंडवंति (तंडव, तांडव) (आ) पुढीलप्रमाणे प्रत्यय लावून नामधातू साधले जातात.
(१) 'य' हा प्रत्यय जोडून :
(क) सिंह-सिंहाय, अमर-अमराय, गरुड-गरुडाय, हंस-हंसाय, दमदम (वाद्यविशेष)-दमदमाय, जलण (अग्नि)६ जलणाय, कंडू-कंडूय, कंडुय
(ख) मम-ममाय (इच्छिणे) (ग) गुरुय-गुरुयाय (२) 'ए' हा प्रत्यय जोडून :
१ म. :- हाताळणे (हात), माणसाळणे (माणूस), ढगाळणे (ढग), पिसाळणे, तावणे
(ताव-ताप), दाबणे (दाब) इत्यादी. २ उदा - कलुसेइ (वर्त.); कंडुइस्सामि, जम्मिही (कथा पृ.२१) (भविष्य); चिरावेहि,
पयडह, कंडुयह, तरलायह, पवित्तेहि (आज्ञार्थ); मइलेज्ज (विध्यर्थ) ३,४ मलयगिरि, (राय.) पृ. २१६ ५ 'य' प्रत्ययापूर्वी शब्दातील अन्त्य 'अ' चा 'आ' होतो. ६ उदा. पियविरहे जलणायंनि ससियरा। लीला. ५०८ ७ तसेच 'विजुयायंति' ( विद्युत्) (राय., टीपा, पृ.९)