________________
२६४
अर्धमागधी व्याकरण
(क) मर-मारे, कर-कारे, पड-पाडे, लभ-लाभे, संचर-संचारे, तवतावे, गह (ग्रह)-गाहे, वित्तस (वित्रस्) -वित्तासे, खम-खामे, धर-धारे, पसरपसारे, तर-तारे, हर-हारे, चल-चाले, निवड(निपत्) -निवाडे, पढ-पाढे, नसनासे, हस-हासे.
(ख) संपाव-संपावे, वेढ-वेढे, किलाम-किलामे, पीण-पीणे, पाल-पाले, पक्खाल-पक्खाले.
(२) कधी धातूंतील इ, उ चा गुण होऊन 'ए' 'ओ' प्रत्यय लागतात. (क) खिव (क्षिप्)-खेवे, विय (विद्-जाणणे) -वेए, पविस-पवेसे.
(ख) पुस-पोसे, मुय-मोए, कुव (कुप्)-कोवे, तुस (तुष्)-तोसे, रुय (रुच्)-रोए, विसुह (विशुध्)-विसोहे, बोहे (बुध्)
(इ) कधी एकाच धातूला प्रयोजकाचे दोन निरनिराळे प्रत्यय लागून झालेले प्रयोजक धातू आढळतात.
कारावे, भोयावे, खेवावे.
(ई) काही धातूंना ‘आड' प्रत्यय लागून प्रयोजक धातू होतात. भमभमाड, देख-देक्खाड.
(उ) कधी संस्कृतमधील प्रयोजकाचा ‘अय' प्रत्यय अर्धमागधीतही तसाच राहिलेला आढळतो.
जणयइ, ठावयइ; जणयंति, तालयंति, निओजयंति (ऊ) पुढील काही प्रयोजक धातू संस्कृतमधून वर्णान्तराने आले आहेत.
घाएइ (घातयति), पज्जेइ (पाययति), दरिसेइ, दंसेइ (दर्शयति), भेसेइ (भीषयति), उप्पायइ (उत्पादयति), पलीवेइ (प्रदीपयति), सक्कारेइ (सत्कारयति), वाएइ (वादयति), आणवेइ (आज्ञापयति), विनवेइ (विज्ञापयति), वावाएइ (व्यापादयति), पूरेइ (पूरयति), पइट्ठावेइ (प्रतिस्थापयति), संजोएइ (संयोजयति),
आसासइ (आश्वासयति), ववरोवेइ (व्यपरोपयति), जोएइ (योजयति), छेएइ (छेदयति), दवावे, दावावे (दापयति).
१
प्रायः तृतीय पुरूषी रुपात ‘अय' तसाच राहिलेला आढळतो.