________________
प्रकरण १५ : साधित शब्द : साधित धातू
२६३
चालतात; तसेच त्यापासून साधित शब्दही तयार होतात.
प्रयोजक धातू साधण्याचे प्रत्यय पुढील प्रमाणे आहेत :(अ) मूळ धातूंना खालील प्रत्यय' जोडून प्रयोजक धातू साधिले जातात.३
(१) अकारान्त धातूंना ‘आवे'' हा प्रत्यय जोडून
जाण-जाणावे, किण-किणावे, दल-दलावे, वेढ-वेढावे, पिय (पा-पिणे) - पियावे, छिंद-छिंदावे, बंध-बंधावे, हण-हणावे, खण-खणावे, लिह-लिहावे.
(२) आकारान्त धातूंना 'वे' प्रत्यय जोडून. ठा-ठावे, ण्हा-हावे, जा (या)- जावे, गा-गावे.
टीप :- कधी प्रत्ययापूर्वी आकारान्त धातूंतील 'आ' चा 'अ' होतो. ठवे, परिट्ठवे.
(३) एकारान्त व ओकारान्त धातूंना ‘यावे' हा प्रत्यय जोडून नेयावे, (होयावे).
(आ) (१) काही अकारान्त धातूंना ‘ए' हा प्रत्यय लागून प्रयोजक धातू होतात. प्रत्ययापूर्वी धातूंतील 'अ'६ चा प्राय: 'आ' होतो; धातूंत दीर्घ स्वर असल्यास तो तसाच राहतो.
उदा.:- वंचाविंत, किणावेमाण, पच्चक्खावेमाण, आणवेमाण (कर्तरि व.का.धा.वि.); दाविय, संठविय, जाणाविय, तोसिय, कारिय, परिणाविय, ठविय, जीवाविय (क.भू.धा.वि.); ठाएयव्व (वि.क.धा.वि.); कराविऊण, आणाविय, मन्नाविऊण, ठाविऊण, ठविऊणं, सिक्खावित्तु, एहविऊण, ठविऊण, आरोविऊण, ठवित्त (ल्यबना); सिक्खविउं, धराविउं, करावेउ (तुमन्त).
णेरदेदावावे। (अ,ए, आव,आवे) हेम. ३.१४९; क्वचिदवश्च ।- क्वचिदिति सिद्धप्रयोगानुसाराद् युक्तान्तधातुविषये। मार्कं. ६.४६. म. : करणे-करवणे, करविणे ; बोलवणे, बोलविणे ; सांगवणे, सांगविणे इत्यादी. कधी ‘आव' तर कधी ‘अव' हे प्रत्ययही जोडले जातात उदा. कराव, हसाव, उवसमाव; वड्डव, पेल्लव. यावेळी कधी 'अ' प्रत्ययच जोडला जातो :- हर-हार, पड-पाड, मर-मार (अदेल्लक्यादेरत आः।- णेरदेल्लोपेषु कृतेषु आदेरकारस्य आ भवति । हेम.३.१५३) कधी हा 'आ' होत नाही :- नम-नमे, अभिनव-अभिनवे, गम-गमे इत्यादी.
६