________________
२६२
अर्धमागधी व्याकरण
(अ) पौन : पुन्यार्थक धातूंच्या धातूसाधितांचाही उपयोग अर्धमागधीत आढळतोः
(१) खोखुब्भमाण (क्षुभ्), जागरमाण, जागरमाणी, भिब्भिसमाण, भिब्भिसमीण ; लालप्पमाण, चंकमियव्व, चंकमंत, रेरिजमाण (अतिशय शोभणारे).
(२) किलिकिलिंत, गुमगुमगुमंत, छिमछिमछिमंत, कढकढकढेंत' २८ इच्छार्थक धातू
इच्छार्थक धातू साधण्याचीही स्वतंत्र प्रक्रिया अर्धमागधीत नाही. जे काही थोडे इच्छार्थक धातू अर्धमागधीत वापरले जातात, ते संस्कृत वरून वर्णान्तराने आलेले आहेत. उदा.
दुगुच्छ, दुगुंछ, दुउंछ, दुउच्छ, जुगुच्छ; तिगिच्छ (चिकित्सा करणे), वितिगिछ, वितिगिच्छ; सुस्सूस (श्रु), पिवास (पिपासति) (अ) इच्छार्थक धातूंच्या काही साधितांचाही उपयोग आढळतो :
दिगिच्छंत (जिघत्सत्-खाउ इच्छिणारा); दुगुंछमाण, दुगंछमाण ; दुगंछणिज्ज; तिगिच्छिय, वितिगिच्छिय; सुस्सूसनाण, तिगिच्छिउं.३ २५९ प्रयोजक धातू ___मूळ धातूने दर्शविलेली क्रिया ‘दुसऱ्याकरवी करविणे' हा प्रयोजकाचा अर्थ असतो. साहजिकच, मूळचे अकर्मक धातू सुद्धा प्रयोजकात सकर्मक होतात. निराळ्या शब्दांत सर्वच प्रयोजक धातू सकर्मक बनतात.
प्रयोजक धातू हे द्वितीय वर्गीय धातूंप्रमाणे सर्व काळांत" व अर्थात
१ २ ३
किलकिल, गुमगुम, छिमछिम, कढकढ असा आवाज. इच्छार्थक धातूंचा उपयोग अर्धमागधीत तुरळक आहे. वसु. पृ. ३१६ कधी प्रथम वर्गीय धातूंप्रमाणेही चालविले जातात. उदा. मारइ, पाडइ इत्यादी. उदा. :- कारेइ, पाडेइ, हसावेइ, जाणावसि, ठवेंति, ठावइ, सिक्खावेइ, उट्ठावेइ (वर्त.); कारित्था, करावित्था, पहारेत्था, गिण्हाविंसु, पट्ठवइंसु, संपाहरिंसु (भूत.) गेण्हावेस्सामि, मारिस्सइ, वद्धावेही, ठविस्सइ, सिक्खावेही, सिक्खावेहिंति, ठाविस्संति (भविष्य.), ण्हावेह, कारेउ, ठवेह, आणावह, आणवेसु, ठवेसु, रक्खावसु, जीवावसु, परिणावसु (आज्ञार्थ); आरंभावेज्जा (विध्यर्थ)