________________
प्रकरण १५
साधित शब्द : साधित धातू
BRCAERIAERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERER
२५५ प्रास्ताविक
नाम, सर्वनाम, विशेषण व धातू असे जे विकारी शब्द आहेत, त्या शब्दांना आणखी प्रत्यय वगैरे जोडून नामे, विशेषणे, धातू वा अव्यये साधिता येतात. अशा साधित शब्दांचा विचार आता करावयाचा आहे.
२५६ साधित धातू
प्रत्यय लावून काही धातू सिद्ध केले जातात. त्यांना साधित धातू वा प्रत्ययान्त धातू असे म्हणतात. हे साधित धातू (१) धातूसाधित व (२) नामसाधित' असे दोन प्रकारचे आहेत. या दोन्ही प्रकारच्या साधित धातूंचा विचार आता केला आहे.
२५७ पौनः पुन्यार्थक वा अतिशयार्थक धातू
असले धातू साधण्याची स्वतंत्र प्रक्रिया अर्धमागधीत नाही. असे जे काही थोडे धातू अर्धमागधीत आहेत, ते संस्कृतमधून वर्णान्तराने आलेले आहेत आणि त्यांचा वापरही कमीच आहे. उदा.
(१) जागर, चंकम (क्रम्-भटकणे), लालप्प (लाड करणे), भिब्भिस (भास् - प्रकाशणे)
१
२
—
३
४
(२) काही नादानुकारी धातूंची पौनः पुन्यार्थक रूपे अशी आढळतात :खणखणखणंति, कणकणकणंति, मडमडमडंति'.
वा. वे. आपटे, पृ. ११२
येथे 'नाम' हा शब्द सर्वनाम व विशेषण यांचे ही उपलक्षण आहे.
पं.बेचरदास, पृ. २४९
खणखण, कणकण, मडमड असा आवाज करणे.