________________
२५८
अर्धमागधी व्याकरण
(६) आवि (आविस्) :- आविब्भूय २५२ उभयान्वयी अव्यये
दोन शब्द वा वाक्ये जोडण्यास उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो. विशेषत: वाक्ये जोडण्याचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.
वाक्यांचे परस्परांशी विविध प्रकारचे- कार्यकारण, विरोध, समुच्चय, विकल्प इत्यादी संबंध असू शकतात. हे संबंध दाखवून वाक्ये जोडण्यास भिन्न भिन्न उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो. वाक्यांचे हे परस्पर संबंध व ते व्यक्त करणारी उभयान्वयी अव्यये पुढीलप्रमाणे आहेत. (१) समुच्चय :
___च, य, न, च, न, य; तदणु, तयणु; इओ य (इतश्च); तहा य, अवि (अपि), अवि य (अपि च), केवलं-अवि, किं पुण, अह (अथ), पुव्वं-तओ (पूर्व-ततः), अणंतरं, अणंतरं च, तओ य (ततश्च), अन्नं च (अन्यत् च), अवरं च (अपरं च), किं च, यावि (चापि), तयणंतरं; पढम-पच्छा, तओ परं (तत:परम्). (२) विकल्प :
व, वा; वा वा; किंवा, अहवा; अदु, अदुव, अदुवा; उय (उत); उदाहु, उयाहु, उदाहो; अन्नहा (अन्यथा), इहरा, इयरहा (इतस्था). (३) विरोध :
(अ) किंतु, तु, उ, परं, परंतु; पुण (पुनः), केवलं.
(आ) जइ वि (यद्यपि), (तह वि तथापि) (४) कार्यकारण :
(अ) जं-तं (यद्-तद्), जम्हा-तम्हा (यस्मात्-तस्मात्); ता, तओ, तो (ततः); अओ (अत:); तेण हि; जेण-तेण (येन-तेन)
(आ) हि, जहा-तहा (यथा-तथा), इइ (इति), जाव (यावत्) (५) संकेत :
जइ-तो, ता (यदि-ततः), चे (चेत्), तरिहि' (तर्हि), अह (अथ)
१ २
सुर. १४.२११ सुर. १.१३२