________________
प्रकरण १४) अव्यय विचार
888888888888888888888888888888888888888888888888888383
२४९ अव्यय
तीनही लिंगी, सर्व विभक्तींमध्ये आणि सर्व वचनी ज्या शब्दांचे रूप विकार न पावता सारखेच राहते, ते अव्यय होय. निराळ्या शब्दात, वाक्यात उपयोग असता अव्ययात विकार होत नाहीत. __ अव्यये ही मुख्यत: चार प्रकारची आहेत
(१) क्रियाविशेषण :- हे मुख्यत: क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते.
(२) शब्दयोगी :- ही अव्यये नामांना वा धातूंना जोडून येतात. धातूंना जोडून येणाऱ्यांना उपसर्ग अशी विशेष संज्ञा आहे.
(३) उभयान्वयी :- दोन शब्द अथवा वाक्ये जोडणे, हे कार्य ही अव्यये करतात. १ सदृशं त्रिषु लिङ्गेषु सर्वासु च विभक्तिषु।
वचनेषु च सर्वेषु यन्न व्येति तदव्ययम् कातन्त्रव्याकरण (वा.वे. आपटे, पृ.४ वर उद्धृत) काही अव्यये सिद्ध आहेत, तर काही साधित आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण व धातु यांच्यापासून अव्यये साधता येतात. या साधित अव्ययांचा
स्वतंत्रपणे विचार साधितशब्द' या प्रकरणात केला आहे. ३ या मुख्य चार प्रकारच्या अव्ययांखेरीज काही निपात वा लघु अव्यये
आहेत. उदा. एव, खलु, अपि इ. ४ नेसफील्ड (पृ.९३) च्या मते, नाम व सर्वनाम सोडून इतर कोणत्याही
शब्दांबद्दल क्रियाविशेषण अधिक माहिती देते. उदा. अईव उवसोभेमाणी; अईव इट्ठाओ (सुर. ११.१९७); अईव बाहा (बाधा)। (कथा पृ. १२०)