________________
२४८
अर्धमागधी व्याकरण
१) सुरसारियातीरे जइ तइया काऊण धम्मकिच्चाई । परलोयं साहिंतो म्हि ता धुवं लट्ठयं होत।। (महा. पृ. १६७ अ) तेव्हा गंगा-नदीच्या तीरी धर्मकृत्ये करून जर मी परलोक साधला असता तर खरोखरच चांगले झाले असते.
२) एमं वइयरं सक्को कह वि जाणतो ता को जाणइ तं किं पि पावितो । (महा पृ. १५४ अ) ही हकीकत कशी का होईना जर इंद्रला कळली असती तर तुझे काय झाले असते. कुणास ठाऊक!
___३) अज्ज माहं गणी होतो. ... जइ हं रमंतो परियाए सामण्णे जिणदोसिए ।। (दस ११.९) जिनोपदिष्ट श्रामण्यस्थितीत जर मी रमलो असतो तर मी आज गणी झालो असतो.