________________
२४२
अर्धमागधी व्याकरण
छिंद-छेच्छ पास - दच्छ दे-दच्छ
भंज-भोच्छ मुय-मोच्छ रूय-रोच्छ
विय-वेच्छ (जाणणे) सुण-सोच्छ
२४० भविष्यकाळ : अनियमित रूपे
भविष्यकाळाची पुढीलप्रमाणे काही अनियमित रूपे आढळतात. १) प्र. पु. ए. व. : होक्खं, होक्खामि २) प्र. पु. अ. व. : वक्खामो ( वच्) ३) द्वि. पु. अ. व. : दाहित्थ' ४) तृ. पु. ए. व. : होक्खइ
मो
द्वि. पु.
अंतु
२४१ आज्ञार्थ अ) आज्ञार्थाचे प्रत्यय पुढीलप्रमाणे आहेत :
ए. व. अ. व. प्र. पु.
सु, हि तृ. पु. टीप : १) प्र. पु.अ. व. त कधी 'म्ह' असा प्रत्यय लागतो.
२) द्वि. पु. ए. व. त फक्त अकारान्त धातूंचे कोणतेही प्रत्यय न लागता एक अधिक रूप होते उदा. कुण __अकारान्ताखेरीज इतर स्वरान्त धातूंची मात्र अशी प्रत्ययरहित रूपें द्वि पु. ए. व. त होत नाहीत.
आ) प्रत्ययापूर्वी होणारे फेरफार : १) अकारान्त धातूंच्या अन्त्य 'अ' चा 'मु' 'मो' व 'हि' या प्रत्ययापूर्वी
१ पिशेल पृ. ३६७ २ पिशेल पृ. ३३३ ३ मध्यमैकवचनस्य अतः उत्तरस्य लोपो वा स्यात्। मार्कं ६.३३ तसेच हेम
३.१७५ पहा. ४ हेम ३. १७५