________________
२३४
अर्धमागधी व्याकरण
उदा. हस + इत्था = हसित्था, हस + इंसु = हसिंसु
२) द्वितीय वर्गीय धातूंच्या एकारान्त अंगापुढे प्रत्ययांतील आद्य 'इ' चा लोप होतो. उदा. करे + इत्था = करेत्था
३) (क) तृतीयवर्गांतील आकारान्त धातूंचे पुढे प्रत्ययांतील आद्य 'इ' तसाच राहतो. उदा. गाइत्था, गाइंसु
(ख) तृतीयवर्गीय एकारान्त धातूंच्या पुढे प्रत्ययातील आद्य 'इ' तसाच राहतो. उदा. - नेइत्था
(ग) तृतीयवर्गीय ओकारान्त धातूंच्या पुढे प्रत्ययातील आद्य 'इ' चा लोप होतो उदा. होत्था
२३१ भूतकाळ : धातुरूपे
१) प्रथमवर्ग : अकारान्त धातु 'पास' प्र. द्वि. तृ. पु. पासित्था पासिंसु २) द्वितीय वर्ग : अकारान्त धातु 'कर'२ (प्रत्ययापूर्वी करे) :प्र. द्वि. तृ. पु. करेत्था करेसु ३) तृतीयवर्ग : अ) आकारान्त धातु ‘गा' प्र. द्वि. तृ. पु. गाइत्था गाइंसु
आ) एकारान्त धातु 'ने'३ प्र. द्वि. तृ. पु. नेइत्था नेइंसु
हेमचंद्राच्या मते (स्वरादनतो वा) - अकारान्त वर्जितात् स्वरान्तात् धातोरन्ते अकारागमो वा भवति ४.२४०), अकारान्ताखेरीज इतर कोणत्याही स्वरान्त धातूपुढे 'अ' (य) आगम विकल्पाने होतो. याच्या आधारे, धातूपुढे 'अ' (य) आला म्हणजे प्रत्ययांतील आद्य 'इ' तसाच राहतो, इतरवेळी 'इ' चा लोप होतो, असे म्हणता येईल.
कधी 'पास' प्रमाणे करित्था करिसु अशी रूपे होतात. ३ एकारान्त धातूपुढे प्रत्ययातील आद्य 'इ' चा लोप झाल्यास 'नेत्था नेंसु'
(गांधी, पृ. ७७) अशी रूपे होतील.