________________
प्रकरण १९
सर्वनामरूपविचार
BREKERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERER
१८५ प्रास्ताविक
नामाप्रमाणेच अर्धमागधीतील सर्व सर्वनामे ही स्वरान्तच आहेत.
अर्धमागधीतील मुख्य' सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत.
(अ) पुरुषवाचक :
(१) प्रथम पुरुषवाचक : अम्ह (अस्मद् ), मी, आम्ही
(२) द्वितीय पुरुषवाचक : तुम्ह ( युष्मद्), तू, तुम्ही (३) तृतीय पुरुषवाचक : त ( तद्), तो - ती - ते, ते-त्या-ती. (आ) दर्शक २ :
(१) एय (एतद्) हा, ही, हे (२) इम (इदम्) हा, ही, हे (३) त (तद्) तो, ती, ते
(इ) प्रश्नार्थक : क ( किम् ) कोण ?
(ई) संबंधी : ज (यद्) जो, जी, जे
सर्वनामे आपापल्या लिंगानुसार संबोधन सोडून सहा विभक्तीत चालतात :(१) प्रथमपुरुषी व द्वितीयपुरुषी अम्ह व तुम्ह यांची तीनही लिंगात समान रूपे
२
१ पुढील काही सर्वनामांचाही अर्धमागधीत थोडा फार उपयोग होतो. अन्न (अन्य), अवर (अपर), पर, कयर (कतर ), कयम ( कतम), सव्व (सर्व), एग वा एक्क (एक), स, सग (स्व, स्वक), इयर (इतर), पुव्व (पूर्व), भवंत (भवत्), अन्नयर (अन्यतर), एगयर इ.
अमु (अदस्) या दर्शक सर्वनामाचा अर्धमागधीतील उपयोग नाही म्हणण्या इतका तुरळक आहे. तथापि, तत्साधित 'अमुग' याची काही रूपे आढळतात.