________________
१९६
पुरवणी १ लिंगविचार
संस्कृत-मराठीतल्या प्रमाणेच अर्धमागधीतही पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशी तीन लिंगे आहेत. अर्धमागधीतील पुष्कळ शब्दांचे लिंग संस्कृत वा अर्वाचीन भारतीय भाषांतील त्या त्या शब्दाप्रमाणेच असते, असे समजल्यास बराच निर्वाह होईल.
काही संस्कृत शब्दांची लिंगे अर्धमागधीत आल्यावर बदलली आहेत. अशा काही शब्दांची माहिती पुढे दिली आहे.
अ) पुल्लिंग
:
३
४
५
६
अर्धमागधी व्याकरण
१) प्रावृष, शरद्, तरणि हे शब्द पुल्लिंगांत योजले जातात.
उदा. पाउसो, सरओ, तरणी
२) दिश् व आपस् हे शब्दहि कधी पुल्लिंगांत वापरलेले आढळतात. उदा. दिसो, आऊ.
३) दामन्, शिरस् व नभस्' आणि प्रेमन् व अप्सरस् हे शब्द सोडून इतर सकारान्त व नकारान्त शब्द पुल्लिंगात योजले जातात. उदा. मणो, मणे, तवो, तवे, वओ, वए (वयस्), तमो, तमे, ओए (ओजस्), वच्छे (वक्षस्), याचे कारण असे की शब्दांचे लिंग ठरविण्यास कोश व वाङ्मयीन उपयोग याखेरीज योग्य असे अन्य साधन नाही.
२ प्राकृतशब्दांच्या लिंगाबद्दल पुढील विधाने लक्षात ठेवण्यासारखी आहेत. 'प्राकृते हि लिंगव्यभिचारः, यदाह पाणिनीः स्वप्राकृतलक्षणे लिंगं व्यभिचार्यपि' इति। (मलयगिरी राय, पृ. ३२) मलयगिरी आणखी म्हणतो 'प्राकृते हि लिंगमनियतम् ।' ( राय पृ. १७५)
प्रावृट्शरत्तरणय पुंसि । (हेम १.३१)
घाटगे, पृ. ११९ स्नमदामशिरोनभः । हेम १.३२
मार्कं. ४.२७