________________
प्रकरण १० : नामरूपविचार
१९५
इ) (क) अन्ती एस् व उस् असणाऱ्या शब्दात अन्त्य स् चा लोप होऊन ते ह्रस्व
इकारान्त व उकारान्त होतात. १) सर्पिस् = सप्पि, ज्योतिस् = जोइ, अर्चिस् = अच्चि, हविस् = हवि २) आयुस् = आउ, चक्षुस् = चक्खु, धनुस् = धणु का) कधी कधी अन्त्य स् मध्ये स्वर मिळविला जातो. १) धनुस् = धणुह, दीर्घायुस् = दीहाउस २) चिरायुस् = चिराउसा, आशीस् = आसीसा
वरील काही शब्दांची संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली रूपे अशी :: १) द्वि. ए. व. : आसीसं
२) तृ. ए. व.: चक्खुसा ३) ष. अ. व. : जोइसं (ज्योतिषाम्) ई) पुंस् चे पुम होते.१ १२) हकारान्त शब्द :
स्त्रीलिंगी उपानह् या हकारान्त शब्दातील अन्त्य ह् चा लोप होतो. उपानह = पाहणा, वाहणा
१
समासात पुंस चे पुम वा पुंस होते : पुमवयण (पुंवचन), नपुंसवेय, पुंसकोइलग (पुंस्कोकिल-क)