________________
१९४
अर्धमागधी व्याकरण
९) शकारान्त शब्द : दिश्-दिसा, दिश् = दिसि १०) षकारान्त शब्द : प्रावृष् = पाउस ११) सकारान्त शब्द : अ) अन्ती अस् असणाऱ्या शब्दातील अन्त्य स् चा लोप होऊन ते अकारान्त
होतात. मनस् = मण, वचस् = वय, तेजस् = तेय, तपस् = तव, रजस् = रय, चेतस् = चेय, यशस् = जस, उरस् = उर, नभस् = नह, तमस् = तम, शिरसं = सिर, वक्षस् = वच्छ, सरस् = सर, मेदस् = मेय, स्रोतस् = सोय अप्सरस्' = अच्छरा आपस्२ = आउ
अस् अन्ती असणाऱ्या काही शब्दांची संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली
रूपे पुढीलप्रमाणे : १) प्र. ए. व. : सुमणा, दुम्मणा २) तृ. ए. व. : मणसा, वयसा, तेयसा, मवसा, रयसा, जससा, सिरसा, चेयसा ३) स. ए. व. : उरसि, सिरसि, सरसि, तमसि
आ) अन्ती अस् असणाऱ्या शब्दात कधी कधी स्वर मिळविला जातो. १) श्रेयस् = सेयंस, कनीमयस् = कणीयस, पापीयस् = पावीयस २) विद्वस् = विउस ३) अप्सरस्३ = अच्छरसा
विद्वस् शब्दाची संस्कृतवरून वर्णान्तराने आलेली काही रूपे : १) प्र. ए. व. : विज्ज
२) तृ. ए. व. : विउसा
०
१ हा शब्द स्त्रीलिंगी असल्याने तो अच्छरा असा आकारान्त होतो. २ आपस् शब्द मात्र उकारान्त झालेला आढळतो. ३ हा शब्द स्त्रीलिंगी असल्याने अन्ती आ मिळविलेला आहे.