________________
प्रकरण १० : नामरूपविचार
१८९
२) स्वसृ : या शब्दाचे प्र. ए. व. चे ‘ससा' इवढेच रूप आढळते. ३) ओकारान्त गो : या शब्दाचे पुल्लिंगात ‘गव' अथवा 'गोण' आणि स्त्रीलिंगात
'गावी' वा 'गोणी' असे आदेश होतात. व मग ते आपापल्या अन्त्यस्वरानुसार चालतात. खेरीज 'गो' शब्दाची पुढील रूपे आढळतात. १) प्र. ए. व. : गो, गवे २) प्र. अ. व. : गाओ, गवा ३) द्वि. अ. व. : गाओ ४) तृ. अ. व. : गोहिं
५) ष. अ. व. : गवं ४) औकारान्त नौ : हा शब्द 'नावा' असा आकारान्त होऊन तो 'माला'
प्रमाणे चालतो.
१८४ इतर व्यंजनान्त शब्द
अर्धमागधीत व्यंजनान्त शब्द चालत नसल्याने संस्कृतमधील अनेक व्यंजनान्त शब्द स्वरान्त करून अर्धमागधीत उपयोग-योग्य करून घेतले जातात. मग ते आपापला अन्त्य स्वर व लिंग यानुसार चालतात.
अशा शब्दांची माहिती आता दिली आहे. तसेच संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली अशा शब्दांची रूपेही दिली आहेत. १) चकारान्त शब्द : ‘वाच्’ आणि ‘त्वच' या शब्दात अन्ती 'आ' मिळून
ते ‘वाया', 'तया' असे आकारान्त होतात. मग ते आकारान्त स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात. संस्कृतवरून वर्णान्तरित : तृ. ए. व. : वाया, तया जकारान्त शब्द : ‘भिषन्' शब्दात अन्ती 'अ' मिळून तो 'भिसय' असा अकारान्त होतो व अकारान्त पुल्लिंगी नामाप्रमाणे चालतो. तकारान्त शब्द : क) अत्, वत्, मत् प्रत्ययान्त शब्द अंत, वंत, मंत यांनी
अन्त पावणारे होऊन ते आकारान्त शब्दाप्रमाणे चालतात. त्यांची काही १) हनुमत्' चे कधी कधी हणुय' (पउम. १.५९) होऊन तो अकारान्त शब्दाप्रमाणे
चालतो. उदा. हणुयस्स (पउम. १.८७)