________________
प्रकरण १० : नामरूपविचार
या प्रकारच्या सर्व शब्दांची रूपे नियमितपणे होतात. त्यामुळे नियमित चालणाऱ्या शब्दांचे फक्त अकरा नमुने होतात.
आ) अर्धमागधीत ऋ, ऋ, लृ, ऐ व औ हे स्वर नसल्याने या स्वरांनी अन्त पावणारे शब्द नाहीत. संस्कृतमधील असे शब्द इतर स्वरान्त केले जातात. तथापि संस्कृतमधील ऋकारान्त शब्दांचे बाबतीत त्यांच्या नियमित रूपाखेरीज संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली काही रूपे अर्धमागधीत आढळतात. म्हणून अशा शब्दांची रूपे अनियमित म्हणण्यास हरकत नाही. अशा शब्दांचे नमुने फक्त तीन (पिया, माया, भत्ता) आहेत.
१७५
१
इ) संस्कृतमधील व्यंजनान्त शब्द अर्धमागधीत स्वरान्त केले जातात. अशा काही शब्दांच्या नियमित रूपाखेरीज, संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली काही रूपे अर्धमागधीत आढळतात. म्हणून या शब्दांच्या रूपांनाही अनियमित म्हणण्यास हरकत नाही. अशा शब्दांच्या रूपांचे नमुनेही तीनच ( राय, अप्प, भगवंत) आहेत.
तसेच एकंदर १७ नमुने आत्मसात केले की अर्धमागधीतील कोणत्याही नामाची रूपे सिद्ध करता येतील.
१५५ नामरूपे
नामे ही दोन वचनात, तीन लिंगात व सात विभक्तीत४ चालतात. १) एकवचन आणि अनेकवचन ही दोनच वचने अर्धमागधीत आहेत.
१
२
३
४
यासाठी पुढे परिच्छेद १८४ पहा.
ही रूपे बहुधा तकारान्त, नकारान्त व सकारान्त शब्दांची आढळतात. येथे भगवंत शब्द हा अन्त प्रत्ययान्त व. का. धा. वि. व मन्त आणि वन्त प्रत्ययान्त शब्द यांचेही उपलक्षण आहे.
या पुस्तकात विभक्तीचे प्रत्यय दिलेले नाहीत. प्रत्यय पाठ करून ते लागताना अनेक ठिकाणी कसे विविध विकार होतात इत्यादि गुंतागुंत लक्षांत ठेऊन रूपे सिद्ध करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष रूपेच पाठ करून त्याप्रमाणे इतर शब्द चालविणे, हेच सोपे आहे.