________________
विभाग दुसरा
प्रकरण १००
नामरूपविचार
SALAALASASSAURORA R$&$ASARASAASAASASASABSRSR
१५३ शब्दरूपविचार : प्रास्ताविक
वाक्यात उपयोग असताना काही शब्दात फरक पडतात, तर काहीत फरक होत नाहीत. यादृष्टीने शब्दांचे दोन मुख्य भाग पडतात. १) विकारी किंवा सव्यय : वाक्यात उपयोग करताना ज्यांच्यात विकार होतात, ते २) अविकारी किंवा अव्यय : वाक्यात उपयोग असताना ज्यात विकार होत नाही ते. विकारी व अविकारी शब्दांचे प्रत्येकी चार चार भेद आहेत : अ) विकारी : १) नाम २) सर्वनाम ३) विशेषण ४) धातु अथवा क्रियापद
आ) अविकारी (अव्यय) १) क्रियाविशेषण २) शब्दयोगी ३) उभयान्वयी ४) केवलप्रयोगी (अव्यये) __आता, विकारी शब्दातच बदल होत असल्याने, रूपविचारात फक्त विकारी रूपांचाच विचार करावयाचा आहे.
१५४ नामरूपविचार : प्रास्ताविक
अ) अर्धमागधीत शब्दान्ती व्यंजन चालत नसल्याने अर्धमागधीतील सर्व नामे स्वरान्त आहेत. अर्धमागधीत शब्दान्ती येणारे स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ एवढेच असल्याने शब्दांचे रूप-नमुने अगदी थोडे आहेत.
१) पुल्लिंगी शब्दान्ती अ, इ, वा उ हेच स्वर असतात. २) नपुंसकलिंगी? शब्दांच्या अन्ती अ, इ, वा उ हेच स्वर असतात. ३) स्त्रीलिंगी शब्दांच्या अन्ती आ, इ, ई, उ, ऊ हेच स्वर असतात. १) प्राकृतात (M.I.A.) (वर्णान्तरित ऋकारान्त शब्दांची नपुं. रूपे नाहीत.
(सेन. प. ६५)