________________
प्रकरण ९ : संधिविचार
२) शब्दांना लागणाऱ्या प्रत्ययात जर फक्त एकच स्वर असेल, तर त्याचा इतर
स्वरांशी संधि होत नाही.
देवाओ, मालाए, वणाइं, देवीए,
करइ,
गच्छउ, दाउं, काउं
अपवाद : कधी कधी क्रियापदांच्या रूपात असा संधि झालेला आढळतो.: भुंजइ भुंजे, सेवइ = सेवे३.
३) ह्रस्व अथवा दीर्घ इ, ई, उ, ऊ यांचा पुढील स्वराशी संधि होत नाही. इ) : जाइ - अंध ( जात्यन्ध), पगइ - उवसंत, जाइ - आरिय
ई)
पुढवी- आउ (पृथ्वी-पाणी), धमणी - अंतरेसु (धमन्यान्त) : बहु-अट्ठिय (पुष्कळ हाडे (बी) असलेले), सु-अलंकिय, सु-इसि, चक्खु - इंदिय.
उ)
४) ए, ओ यांचा पुढील स्वराशी संधि होत नाही
२
३
:
४
=
५
६
५) धातूंना जे प्रत्यय लागतात त्यांच्या अन्त्य स्वराचा पुढील स्वराशी संधि
होत नाही.
१५९
बे-इंदिय, ते- इंदिय, अहो अच्छरियं, भमरो आवियई
होइ इह, इच्छसि आवेउं, करेमो एवं
अपवाद : कधी कधी असे संधि केलेले आढळतात.
लभामि+अहं= लभामहं, तरन्ति + एगे = तरंतेगे
बहु-इड्डि,
म. : जाऊ, येऊ, जाऊन, पिऊ, खाऊन
कधी कधी धातूंना लागणाऱ्या प्रत्ययातील स्वरातच संधि झालेला आढळतो. उदा. काहिइ-काही, नाहिइ-नाही, होहिइ-होही, दाहिइ-दाही, विणासिहिइविणासही
पिशेल, पृ. १२४.
न युवर्णस्यास्वे । हेम १.६, 'इको यणचि' इति यः संस्कृते यणादेशः सन्धिरूक्तः स प्राकृते न भवति। इवर्णस्य यत्वमुवर्णस्य च वत्वं न भवति इत्यर्थः । त्रिवि. १.२०
एदोतोः स्वरे । एकार- ओकारयोः स्वरे परे संधिर्न भवति । हेम १.७ त्यादेः । हेम १.९