________________
प्रकरण ९) संधिविचार
888888888888888888888888888888888888888888888888888888
१३७ अर्धमागधीतील संधि ___ अर्धमागधीतील' संधिविचार हा प्रामुख्याने संस्कृत'वरून आलेला आहे. तथापि संस्कृतप्रमाणे अर्धमागधीत “संधि हा आवश्यक व सुसंगत नाही."
संस्कृतमध्ये एका शब्दात, समासांत किंवा वाक्यातील दोन शब्दात स्वर (व्यंजने, विसर्ग) जवळ आल्यास त्यांचा नेहमी संधि होतो. परंतु अर्धमागधीत मात्र जवळ जवळ असणारे वा आलेले स्वर संधि न होता एकत्र राहू शकतात. हा संधि-अभाव एकाच शब्दात, समासात तसेच वाक्यातील शब्दामध्येही आढळून येतो. याचे कारण एकच की अर्धमागधीत सर्वच संधि वैकल्पिक आहेत. ___ जरी अर्धमागधीत संधि वैकल्पिक आहेत, तरी जेव्हा जेव्हा संधि होतात तेव्हा ते कसे होतात, हे पाहणे आवश्यकच आहे. प्रथम, प्रायः संधि केव्हा होत नाही, हे सांगितले आहे. १ अर्धमागधीत विसर्ग नसल्याने विसर्गसंधि नाही, तसेच स्वररहित केवल
व्यंजन शब्दान्ती चालत नसल्याने दोन वा अधिक व्यंजने एकत्र येऊन संधि होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, म्हणजेच व्यंजनसंधिही अर्धमागधीत नाहीत. असे संधि असणारे संस्कृत शब्द प्रायः वर्णविकार होऊन अर्धमागधीत येतात. हे विकार कधी कधी वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांचा विचार परिच्छेद १४९ मध्ये केला आहे. संस्कृतोक्तः सन्धिः सर्वः प्राकृते पदयोः व्यवस्थितविभाषया भवति।
बहुलाधिकारात् क्वचिद् एकपदेऽपि। हेम १.५ ३ घाटगे, पृ. ८२ ४ तरी शब्दात, समासात, वाक्यातील शब्दात, वाक्यांशात प्रायः संधि झालेले
वाङ्मयात आढळतात.