________________
प्रकरण ८ : धातुसाधनिका
१४७
आच्छिद् = अच्छिंद (जबरीने नेणे), आरभ् = आरंभ (आरंभिणे), छिद् = छिंद (तोडणे), नियुज = निउंज (नेमणे), प्रयुज = पउंज (प्रयोग करणे), प्रारभ् = पारंभ, भिद् = भिंद (फोडणे), भुज् = भुंज (भोगणे), युज् = जुंज -जोडणे, रूध् = रूंध (रोधणे), लभ् = लंभ (मिळविणे),
विध् = विंध (वेधणे). ७) कधी कधी धातूंच्या अन्त्य व्यंजनाचे द्वित्व होते व मग त्यात अ मिसळतो.
उन्मिल् = उम्मिल्ल (उमलणे), कुट् = कुट्ट (कुटणे), चल्ल = चल्ल (हलणे), जिम् = जिम्म (जेवणे), त्रुट् = तुट्ट (तुटणे), निमिल् = निर्मल्ल (झाकणे), प्रमिल् = पमिल्ल (उमलणे), मृग् = मग्ग (शोधणे), युग् = जुज्ज (जोडणे), रुच् = रूच्च (आवडणे), लग् = लग्ग (लागणे), विलग्
= विलग्ग (चिकटणे), शक् = सक्क, स्फुट = फुट्ट (फुटणे) ८) कधी कधी अन्त्य व्यंजनापुढे (एखाद्या स्वरासहित) 'ण' येऊन काही
व्यंजनांत धातु अकारांत झालेले आढळतात.
प्राप्-पाउण, शक् = सक्कुण, समर्छ-समज्जिण ९) अनियमित : विध् = विज्झ (वेधणे), स्वप = सोव (निजणे) १०) संस्कृतमधील पुष्कळ धातूंच्या अंगांचे वर्णान्तर होऊन व अन्ती (जरूर
तेथे) अ येऊन अकारान्तीकरण झालेले आढळते. अनुमन् – (अनुमन्य) - अणुमन्न (अनुमति देणे), अनुवृत् (अनुवर्त)अणुवट्ट (अनुसरणे), अपराध – (अपराध्य) - अवरज्झ (अपराध करणे). अभिसिच्-(अभिसिंच)-अभिसिंच, अवबुध्-(अवबुध्य)- अवबुज्झ (जाणणे), आगम-(आगच्छ्)-आगच्छ, आप्रच्छ्-(आपृच्छ्)- आपुच्छ (निरोप घेणे), इष्-(इच्छु)-इच्छ, उत्पद्- (उत्पद्य)-उप्पज (उपजणे),
१ धातूंचे अंग म्हणजे प्रत्ययापूर्वीचे धातूंचे रूप
कधी कधी धातूंच्या अंगाचे वर्णान्तराने द्वित्व झाल्यावर सुलभीकरण होते व मग (जरूर तेथे) अन्ती अ मिसळतो : तुष् (तुस्स)- तूस, शुष्(सुस्स) - सूस, दुष (दुस्स) - दूस, रूष (रूस्स) - रूस, पुष - (पुस्स)- पूस, दृश-(पस्स)-पास,