________________
१४६
अर्धमागधी व्याकरण
व्यंजनान्त धातूत असणाऱ्या ह्रस्व वा दीर्घ इ, ई, उ, ऊ या स्वरांचा गुण होतो व अन्त्य व्यंजनात अ मिसळतो. क) लिख = लेह (लिहिणे), मिल् = मेल (एकत्र येणे), विध् = वेह
(वेधणे), इष् = एस (इच्छिणे), अन्विष् = अन्नेस (शोध करणे), विद्
= वेय (जाणणे), खिद् = खेय (खिन्न होणे), ईह् = एह (इच्छिणे) का) रूह = रोह (वाढणे), आक्रुश् = अक्कोस (शिव्या देणे), नुद् = नोल्ल
(ढकलणे), रुद् = रोय, रोव (रडणे), शुच = सोय (शोक करणे), तुल् = तोल (तोलणे), पुष् = पोस (पुष्ट होणे), रुच् = रोय (आवडणे), लुल्
= लोल, चुर = ; चोर (चोरणे) २) व्यंजनान्त धातूतील ऋ चा अरि होऊन२, अन्त्य व्यंजनात अ मिसळतो.
कृष् = करिस, वृष = वरिस, मृत् = मरिस, हृष् = हरिस ३) स्वप् या धातूंत व चे संप्रसारण होते व मग अन्त्य व्यंजनात अ मिसळतो
: स्वप् = सुय, सुव ४) व्यंजनान्त धातूत असणाऱ्या संयुक्तव्यंजनात स्वरभक्ति होते व मग अन्त्य
व्यंजनात अ मिसळतो. अझ् = अरिह (योग्य असणे), क्लिश् = किलेस (पीडा देणे), गहूं = गरह (निंदा करणे), श्लाघ् = सलह (प्रशंसा करणे), श्लिष् = सिलेस व्यंजनान्त धातूतील मूळच्या स्वरात काहीतरी विकार होतो व मग अन्त्य व्यंजनात अ मिसळतो. घस् = घिस (खाणे, आवाज करणे) धाव = धुव, धोव (स्वच्छ करणे), पिष् = पीस (वाटणे), भास् = भिस (प्रकाशने), हेल् = हील (अनादर
करणे) ६) व्यंजनान्त धातूतील वर्णात अनुस्वारागम होतो व मग अन्त्यव्यंजनात अ
मिसळतो. १ युवर्णस्य गुणः। हेम ४.२३७ २ वृषादीनामरिः। हेम ४.२३५ ३ स्वराणां स्वराः। हेम ४.२३८