________________
प्रकरण ८ : धातुसाधनिका
१४३
तो संस्कृत 'भू' धातूवरून गुण' होऊन आलेला आहे. आ) एकारान्त धातु : संस्कृत धातूंच्या अन्ती असणाऱ्या ह्रस्व किंवा दीर्घ इ.
ई चा गुण होऊन अर्धमागधीतील धातु एकारान्त झालेले आढळतात. उदाइ = ए (जाणे), जि = जे (जिंकणे), पराजि = पराजे (पराजय करणे), उद् + इ = उदे (उगवणे), अनु + इ = अन्ने.. नी = ने (नेणे), विनी = विणे (शिक्षण देणे), आनी-आणे (आणणे), परिणी = परिणे (विवाह करणे), अपनी = अवणे (दूर नेणे) उपनी = उवणे (जवळ नेणे), निर्णी = नीणे (निर्णय करणे), उड्डी = उड्डे (उडणे),
विक्री२ = विक्की क) अनियमित : काही इतर धातु अनियमितपणे एकारान्त झालेले आढळतात
दा = दे, ला = ले (घेणे), ब्रू = बे (बोलणे) इ) आकारान्त धातु :
संस्कृतमधील आकारान्त धातु वर्णान्ताराने अर्धमागधीत येतात. अभ्युत्था = अब्भुट्ठा (उठून मान देणे), आख्या = अ+खा (सांगणे), आधा = आढा (स्थापणे), उत्स्था = उट्ठा (उठणे), उपस्था = उवट्ठा (जवळ जाणे), निधा = निहा (खाली ठेवणे), निर्या = निजा (बाहेर पडणे), प्रत्याख्या = पच्चक्खा (निषेध करणे), या = जा (जाणे), वा = वा (वाहणे), स्था = ठा (उभे रहाणे), स्ना = ण्हा, सिणा (स्नान करणे),
हा = जहा (टाकणे) २) इतर काही धातु अनियमितपणे आकारान्त झालेले आढळतात. गै = गा
(गाणे), ध्यै = झा, झिया (ध्यान करणे) म्लै = मिला (म्लान होणे), ग्लै = गिला (थकणे), अश् = अण्हा (खाणे), खाद् = खा (खाणे), जन् = जा (जन्मणे), भी = भा (भिणे)
१ २
गुण होणे म्हणजे इ, ई, बद्दल ए, व उ, ऊ बद्दल ओ येणे. प्रा. प्र. ८.३१