________________
SPERERERERS
प्रकरण ८
धातुसाधनिका
BRERIASARVAERIAERERERERERERERERERERERERER
१३१ धातूंचा स्वतंत्र विचार
मागे सांगितलेल्या वर्णविकारांत कित्येक स्थळी धातूंचे वर्णविकार तुरळकपणे येऊन गेले आहेत. त्यांचा सविस्तर उलगडा व्हावा म्हणून आता धातूंच्या वर्णविकारांचा स्वतंत्रपणे विचार केला आहे.
१३२ संस्कृतमधील व अर्धमागधीतील धातु
१) संस्कृतमधील धातु काही स्वरान्त (उदा. या, जि, नी, स्तु गै) तर काही (असंयुक्त वा संयुक्त) व्यंजनान्त आहेत ( उदा. गम्, रम्, युध्, स्कन्द्, मन्त्र्). अर्धमागधीत शब्दान्ती व्यंजन चालत नसल्याने संस्कृतमधून अर्धमागधीत घेतले जाणारे सर्व व्यंजनांत धातु स्वरान्त करून घेतले जातात. १ २) तसेच ऋ, ऋ, लृ, ऐ व औ हे स्वर अर्धमागधीत नसल्याने ज्या संस्कृत धातूंत हे स्वर (आदि, मध्ये वा अन्ती) आहेत, त्यांचेही वर्णान्तर होते.
संस्कृतमधील स्वरान्त धातूंच्या बाबतीत : अर्धमागधीत धातूंचे अन्ती प्रायः अ, आ, ए अथवा ओ हे स्वर आढळतात. त्यामुळे संस्कृतमधील याखेरीजचे स्वरान्त धातु या चौकटीत बसण्यासारखे करून द्यावे लागतात. ही सर्व धातुसाधनिका आता पुढे दिली आहे.
१३३ अकारान्तेतर धातु
अ) ओकारान्त : अर्धमागधीत 'हो' हा एकच ओकारान्त धातु आढळतो. व
अर्धमागधीतील सर्व धातु स्वरान्त आहेत.