________________
१४४
अर्धमागधी व्याकरण
१३४ अकारान्त धातु
अर्धमागधीतील बहुसंख्य धातु अकारान्त आहेत. पुढील विविध पद्धतींनी संस्कृत धातु अर्धमागधीत अकारान्त केले जातात. अ) अकारान्तेतर धातूंचे अकारान्त होणे : १) आकारान्त धातूंपुढे 'य' येऊन ते कधी कधी आकारान्त होतात. आघ्रा
- अग्घा - अग्घाय (हुंगणे), प्रतिभा-पडिहा-पडिहाय (दिसणे), मामाय (मोजणे), वा- वाय (वाहणे) हा-हाय, या-जा जाय, ध्यै-झा,
झिया-झाय, झियाय, गै - गा- गाय, स्था - ठा - ठाय, भी-भा- भाय. २) संस्कृत धातूंतील अन्त्य ह्रस्व किंवा दीर्घ इ, ई, व उ, ऊ चे अनुक्रमे अय
आणि अव होऊन ते अर्धमागधीत अकारान्त होतात. क) जि-जय, शी-सय (निजणे), विनी = विणय ख) च्यु = चव (गळणे), प्लु = पव (पोहणे), निलु = निह्नव (लपविणे),
सु = सव (स्रवणे), भू = भव, हव ;प्रसू - पसव, प्रभू = पभव, पहव
टीप : कधी कधी धातूंतील अन्त्य उ, ऊ चा उय अथवा उव होतो. १) स्तु = थुय, हु = हय (होम करणे), धू = धुय (हलविणे) २) स्तु = थुव, हु३ = हुव, निगु = निह्नव, प्लु = पुव, रू =रूव , लू = लुव
(कापणे), धू = धुव४ ३) धातूंतील अन्त्य ऋ, ऋ चा अर होऊन ते अकारान्त होतात.५ क) ह्रस्व ऋ = अर : अनुसृ = अणुसर , अपसृ = ओसर, अपह = अवहर,
अभ्युद्ध = अब्भुद्धर, उदाह = उदाहर, उद्धव = उद्धर, उपसंहृ =उवसंहर, १ आतोऽद्वा । - धातोः आकारात् उत्तरे अकारागमो वा स्यात् । मार्क
७.६० हेमचंद्राच्या मते तर - स्वरादनतो वा। अकारान्तवर्जितात् स्वरान्ताद्
धातोरन्ते अकारागमो वा भवति । हेम ३.२४०. २ उवर्णस्यावः। धातोरन्त्यस्योवर्णस्य अवादेशो भवति । हेम ४.२३३. ३ मार्कं ७.६५, ८८, ९३ ४ मार्कं ७.९१, ९३ ५ ऋवर्णस्यारः । हेम. ४.२३४.