________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
१०९
आयु:क्षय=आउक्खय, नि:श्वास=(निस्सास)-नीसास. (३) अनुस्वार वा अनुनासिक प्रथमस्थानी असता अनुस्वार राहतो. अर्धमागधीत
अनुस्वारापुढे जोडाक्षर चालत नसल्याने उरलेल्या अवयवाचे द्वित्व झाल्यास
द्वित्वातील पहिल्या व्यंजनाचा लोप होतो. (अ) रन्ध्र-रंध, काङ्क्षा कंखा, विन्ध्य=विंझ, सन्ध्या संझा, पङ्क्ति पंति,
मुनीन्द्र=मुणिंद, मन्त्र=मंत, तन्त्र=तंत, सक्षेप संखेव, सम्प्रेक्ष्=संपेह. (आ) संस्थित संठिय, संस्थान=संठाण. (४) काही विशिष्ट तीन अवयवी संयुक्तव्यंजनांचे विकार असे : (अ) क्ष्ण : (१) कधी कधी पहिल्या स्पर्शाचा लोप होऊन ग्रह होतो.
श्लक्ष्ण=सण्ह, तीक्ष्ण तिण्ह (२) कधी कधी अन्त्य ण् चा लोप होऊन क्ख होतो. तीक्ष्ण=तिक्ख (हिंदी : तीखा)
(आ) क्ष्म : (१) कधी कधी पहिल्या स्पर्शाचा लोप होऊन म्ह होतो.
पक्ष्मन्=पम्ह (पापणीचे केस), पक्ष्मल पम्हल (केसाळ,लांब केसाचा) (२) कधी कधी अन्त्य म् चा लोप होऊन ९ चा ख वा च्छ होतो.
लक्ष्मण लक्खण, लक्ष्मी लच्छी (३) कधी क्ष्म चा ग्रह होतो : सूक्ष्म=सण्ह (हेम. २.७५) (इ) क्त्व, त्क्ष, द्ध्व, त्स्न, त्स्थ मध्ये पहिल्या स्पर्शाचा लोप होऊन मग
वर्णान्तर होते. क्त्व=च्च : भुक्त्वा भोच्चा त्क्ष क्ख : उत्क्षिप्त=उक्खित्त, तत्क्षणम्=तक्खणं त्क्षच्छ : उत्क्षुभ्यति उच्छुभइ
द्ध्व ज्झ : बुद्ध्वा बुज्झा त्स्थ=8 : उत्स्थित=उट्ठिय, उत्स्था उट्ठा त्स्न=ण्ह : ज्योत्स्ना=जोण्हा १०८ आद्य संयुक्तव्यंजनांचे विकार
द्वित्वाच्या नियमासह मध्य संयुक्तव्यंजनांचे नियम आद्य संयुक्तव्यंजनांना