________________
११०
अर्धमागधी व्याकरण
लागतात. नंतर, अर्धमागधीत शब्दाचे, आद्यस्थानी संयुक्तव्यंजन चालत नसल्याने, समानीकरण होऊन झालेल्या द्वित्वांतील पहिल्या व्यंजनाचा लोप होतो.१
क्रम=(क्कम) कम, क्रोध कोह; ग्राम= (ग्गाम)गाम; ज्ञान =(नाण)नाण, ज्ञात=(ना) नाय; त्याग=(च्चाय) चाय; त्रिलोक= (त्तिलोय) तिलोय, त्यागिन्= चाइ; युति= (ज्जुइ) जुइ, ध्वज=(ज्झय) झय; न्याय= (नाय) नाय ; प्रभा पहा, प्राकार पायार, प्रकार पयार ; ब्राह्मण (ब्बभण) बंभण ; व्यसन (व्वसण) वसण; श्वापद= (स्सावय) सावय, श्वास सास, श्वेत सेय; स्तव= (त्थव) थव, स्कन्धावार खंधावार (सैन्य,छावणी), स्फुट-फुड. (अ) आद्य क्ष चे पुढीलप्रमाणे भिन्न भिन्न विकार होतात. (१) क्ष=ख : क्षण खण, क्षत्रिय खत्तिय, क्षय=खय, क्षीर खीर, क्षीण खीण (२) क्ष=छ : क्षुधा छुहा, क्षुभ् छुह.
एकाच शब्दात ख व छ : क्षण खण, छण; क्षार खार, छार ; क्षुर खुर, छुर; क्षमा-खमा, छमा. क्ष=च : क्षुल्ल=चुल्ल (लहान, तुच्छ), क्षुल्लपिता= चुल्लपिया, क्षुल्लतात=चुल्लताय (म. : चुलता), क्षुल्लहिवत्=चुल्लहिमवंत क्ष=झ : क्षरति=झरइ (म. : झरणे), क्षाम-झाम, क्षीयते झिज्जइ. (म : झिजणे); क्षीण झीण
(४)
१०९ आद्य संयुक्तव्यंजन : अनियमित विकार
आद्य संयुक्तव्यंजनाचे पुढीलप्रमाणे अनियमित विकार आढळतात द्व=३ (ब्ब) ब : द्वारवती=बारवई, द्वितीय=बिइय ब्रम : ब्राह्मण माहण
स्त=ख : स्तम्भ =खंभ १ म. : स्थाली-थाळी, द्वे-बे, त्रीणि-तीन, द्वार-दार, स्तन=थान, प्राकार
पार, ग्राम-गाव, श्वापद-सावज. हिंदी: श्वास-सास. २ हेम. २.३
३ म. : द्वितीय -बीज , द्वादश-बारा ४ हेम. २.८ काहींच्या मते 'खंभ' हा 'स्कम्भ' या शब्दापासून होतो.
(पिशेल, इं पृ. २१७)