________________
१०८
ष्ट=क्क
: दष्ट=डक्क
ष्ट=द्ध
: आश्लिष्ट = आलिद्ध (हेम. २.४९ )
ष्ट=ड्ढ : कृष्ट=कड्ड' (म काढलेले) पल्लट्ट (म. : काढलेले)
स्त =
ट्ट : पर्यस्त
स्थ=ट्ठ
: अस्थि=अट्ठि, उपस्थित = उवट्ठिय, संस्थित=संठिय, यथास्थित=जहट्ठिय.
अर्धमागधी व्याकरण
=
१०७ तीन अवयवी संयुक्तव्यंजनांचे विकार
‘सर्वात कमी बलवान् अवयवाचा लोप' हा समानी करणाचा विशेष तीन अवयवी संयुक्तव्यंजनांनाही लागू पडतोच. त्याचा लोप झाल्यावर मग उरलेल्या दोन अवयवी संयुक्त व्यंजनाचे विकार मागे सांगितलेल्यांपैकी कोणत्यातरी एका प्रकाराने होतात.
प्रथम कुणाचा लोप होतो याविषयी अधिक महिती पुढीलप्रमाणे देता
येईल.
(१) (अ) पहिला अवयव अंतस्थ असल्यास प्रथम त्याचा लोप होतो. वर्त्मन्=वट्टा, मूर्च्छति=मुच्छइ, पार्ष्णि=पण्हि, निर्भर्त्सना=निब्भच्छणा. (आ) अन्त्य अवयव अंतस्थ असल्यास प्रथम त्याचा लोप होतो. (१) य् चा लोप : सापत्न्य = सावत्त, मत्स्य = मच्छ, दुष्पेक्ष्य = दुपेच्छ,
अलक्ष्य = अलक्ख, माहात्म = माहप्प
(२) य् चा लोप : शस्त्र = सत्थ, शास्त्र = सत्थ, उद्भान्त = उब्भंत, निष्प्रभ = निप्पह, राष्ट्र=रट्ठ, दुष्प्रतिकार=दुप्पडियार, अस्थ=अत्थ
(३) व् चा लोप : सम्यक्त्व = सम्मत्त, उच्छ्वास = उस्सास, पृथक्त्व=पुहुत्त (इ) प्रथम आणि अन्त्य या दोन्ही स्थानी अंतस्थ असता प्रथमस्थानी अंतस्थाचा लोप प्रथम होतो.
१
मर्त्य=मच्च, सामर्थ्य=सामच्छ, ऊर्ध्व=उड्ढ
(२) पहिला अवयव विसर्ग असल्यास प्रथम त्याचा लोप होतो.
निःस्थान=निट्ठाण, वक्ष:स्थल=वच्छत्थल, तपः प्रधान = तवप्पहाण,
हेम २.४७