________________
१०६
अर्धमागधी व्याकरण
(आ) संस्कृतात विसर्गापुढे मृदु व्यंजन असता (जेथे ओ होतो, तेथे) अर्धमागधीत कधी कधी विसर्गाचा मागील स्वरासह ए होतो.
अधोलोक= अहेलोग
(इ) संस्कृतमध्ये जेथे विसर्गापुढे मृदु व्यंजन येऊन विसर्गाचा र् होतो, तेथे कधी कधी अर्धमागधीत विसर्गाचा मागील स्वरासह ओ होतो. अन्तर्दुष्ट=अंतोदुट्ठ, अन्तर्जाल = अंतोजाल, अन्तर्निष्क्रान्त=अंतोनिक्खंत, अन्तर्गृहम् = अंतोगिहं (घरात)
(ई) संस्कृतात विसर्गापुढे मृदु व्यंजन असूनही कधी कधी अर्धमागधीत मात्र विसर्ग नाही असे मानून सरळ वर्णान्तर होते.
मनोगुप्त=मणगुत्त, यशोवर्धन=जसवद्धण, तपोलोप=तवलोव, सरोवर=सरवर, मनोहर=मणहर, शिरोरोग = सिररोग, सरोरुह = सररुह (कमळ)
(३) विसर्गापुढे ऊष्म :
(अ) विसर्गापुढे ऊष्म वर्ण असता विसर्गाचा लोप होऊन ऊष्माचे द्वित्व होते. निःशङ्क =निस्संक, नि:शेष = निस्सेस, दुःशासन=दुस्सासण, नि:श्वास=निस्सास, मनःशिला = मणस्सिला; दु:सह=दुस्सह, निःसह=निस्सह.
(आ) विसर्गापुढे ऊष्म असता विसर्गाचा मागील स्वरासह कधी कधी ए किंवा ओ होतो.
ए : अधःशिरस्=अहेसिरं.
ओ : अधःशिरस्=अहोसिरं, अन्तःशल्प=3 =अंतोसल्ल, अन्त:शाला=अंतोसाला, मन:शिला=मणोसिला; अन्तः सुषिर = अंतोज्झसिर, प्रातःस्नान = पाओसिणाण.
(इ) विसर्गापुढे ऊष्म असता कधी कधी विसर्ग नाही असे समजून सरळ वर्णान्तर होते.
मन:समाधि=मणसमाहि; मन:शिला = मणसिला.
(अ) अनुस्वारागम झाल्यास : मन:शिला=मणंसिला
(आ) सुलभीकरण झाल्यास : निःशङ्क =नीसंक, नि:शेष = नीसेस, निःसह=नीसह