________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
(१) विसर्गापुढे कठोर व्यंजन :
(अ) विसर्गापुढे वर्गीय कठोर व्यंजन असता विसर्गाचा लोप होऊन त्या कठोर व्यंजनाचे द्वित्व होते.
अन्तःकरण= =अंतक्करण, दुःख-दुक्ख, अन्तःपात= = अंतप्पाय ( अंतर्भाव )
(आ) विसर्गापुढे वर्गीय कठोर व्यंजन असता मागील स्वरासह विसर्गाचा कधी कधी ए अथवा ओ होतो.
ए : पुर:कर्मन्=पुरेकम्म, अन्तःपुर=अंतेउर
तपः
प:कर्मन्= तवोकम्म, मिथःकथा=मिहोकहा, रह:कर्मन्=रहोकम्म, यश:कामी=जसोकामी
(इ) विसर्गापुढे वर्गीय कठोर व्यंजन असता कधी कधी विसर्ग नाही असे मानून सरळ वर्णान्तर होते.
मनःप्रयोग=मणपओग, उरः परिसर्प = उरपरिसप्प, दुःख=दुह, दुःखिन्=दुहि. संस्कृतमध्ये जेथे विसर्गाचा श्, ष् स् होऊन पुढील कठोर व्यंजनाशी संधि झालेला आहे, तेथे विसर्ग नाही असे मानून कधी कधी वर्णान्तर होते. नमस्कार=नवयार; तपश्चरण = तवचरण, निश्चेष्ट = निचेट्ठ; उरस्तट = उरतड, नभस्तल=नहयल, सरस्तीरे=सरतीरे.
ओ
१
१०५
:
(२) विसर्गापुढे मृदु व्यंजन :
(अ) विसर्गापुढे मृदु व्यंजन' येऊन मागील स्वरासह विसर्गाचा संस्कृतमध्ये जेथे ओ झालेला आहे, असे काही शब्द सरळ वर्णान्तराने अर्धमागधीत येतात.
२
मनोरथ=मणोरह, तपोरत=तवोरय, अधोलोक=अहोलोग, मनोगत=मणोगय, तपोधन=तवोधण, शिरोदुःख = सिरोदुक्ख, शिरोवेदना=सिरोवेयणा, अधोगत=अहोगय, मनोरम = मणोरम
प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने - क्, ख्, च्, छ्, टू, ठ्, त्, थ्, प्, फ्, - ही कठोर होत.
प्रत्येक वर्गातील तिसरी व चौथी - ग्, घ्, ज्, झ, ड्, ढ्, द्, ध्, ब्, भ्व्यंजने, अनुनासिके, अंतस्थ व ह् ही मृदु व्यंजने होत.